विधान परिषद निवडणूक : अखेर 2 तास विलंबाने मतमोजणीला सुरूवात

73

राज्यसभा निवडणुकीच्या सत्तासंघर्षानंतर विधान परिषदेची निवडणूक पार पडली आहे. मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पण काँग्रेसने भाजपच्या दोन आमदारांवर आक्षेप घेतला. काँग्रेसने याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची मतमोजणीही लांबणीवर पडण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. भाजपने या आक्षेपावर केंद्रीय निवडणूक आयोगाला लेखी उत्तर पाठवले आहे. त्यानंतर 2 तास विलंबाने मतमोजणी सुरू झाली.

निवडणुकीच्या आचार संहितेचे उल्लंघन 

विधान परिषदेसाठी दुपारी ४ वाजेपर्यंत २८५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतपेट्या बंद करण्याआधी काँग्रेसने भाजपचे आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्यावर आक्षेप घेतला आहे. गुप्त पद्धतीने मतदान असताना मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचे मत हे दुसऱ्या व्यक्तीने मतपेटीमध्ये टाकले आहे. त्यानंतर मुक्ता टिळक आणि लक्ष्ण जगताप यांनी सही सुद्धा केली. जर दोन्ही आमदारांनी सही केली असेल तर मतपत्रिका ही दुसऱ्या व्यक्तीने का टाकली, असा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे ५ वाजता मतमोजणी सुरू होईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. मतपत्रिकेवर प्राधान्य क्रम लिहिणे आणि मतपत्रिका मतपेटीत टाकणे या दोन्ही बाबी दोन्ही मतदात्यांच्या प्रतिनिधी यांनी केल्याने मतदान हे अवैध ठरते, असा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे. निवडणुकीच्या आचार संहिता १९६१ चं हे उल्लंघन असल्याचे या आक्षेपात नोंदवले आहे. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी थांबवण्यात आली. त्यानंतर 2 तास विलंबाने मतमोजणी सुरू झाली.

(हेही वाचा मतदान संपले आता निकालाची प्रतीक्षा! चमत्कार घडणार की आकडे जिंकणार?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.