कोल्हापूर, धुळे-नंदुरबारसह मुंबईतल्या दोन जागांवर बिनविरोध निवडणूक होणार

187

विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागेसाठी येत्या १० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, आज शुक्रवारी दुपारी ३ वाजता अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. त्यानंतर या विधान परिषदेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामध्ये कोल्हापूर, धुळे-नंदुरबार आणि मुंबईतील दोन जागांवर बिनविरोध निवडणूक होणार आहे. तर नागपूरमध्ये मात्र कॉंग्रेस आणि भाजप आमने-सामने येणार आहे. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूरमधून उमेद्वारी देण्यात आल्याने या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोल्हापूर आणि नंदुरबार-धुळे या दोन जागा बिनविरोधात झाल्या असून एक जागा काँग्रेसच्या वाटेला आली आहे तर एक जागा भाजपाला गेली आहे. नंदुरबार-धुळ्याची जागा भाजपला तर कोल्हापूर विधानपरिषदेची जागा काँग्रेससाठी आली आहे. यासोबतच मुंबईतील दोन जागांपैकी एक जागा शिवसेना आणि दुसरी जागा भाजपला अशा एकूण चार जागांवर बिनविरोध निवडणूक होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

(हेही वाचा – राज्यात मार्चमध्ये येणार भाजप सरकार, राणेंची नवी तारीख)

“अर्ज परत घेण्याची मुदत संपली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयरच विजयी होतील. नागपूरसाठीचा कोणताही प्रस्ताव भाजपाकडून आला नाही. त्यामुळे नागपूरचा निर्णय झालेला नाही”,असेही नाना पटोले यांनी सांगितले. कोल्हापुरमध्ये काँग्रेसने सतेज पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपने अमल महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यामुळे ही लढत अधिक अटी-तटीची होईल, असे म्हटले जात आहे. पंरतु अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे सतेज पाटील यांची बिनविरोध निवडणूक होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.