Vidhan Parishd Election Result : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनितीवर शिक्कामोर्तब !

विधान परिषदेत महायुतीचाच डंका, सर्व नऊ उमेदवार विजयी, तर काँग्रेसची मते फुटली ?

192
Vidhan Parishd Election Result : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनितीवर शिक्कामोर्तब !

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी (१२ जुलै) झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार निवडून आले. त्यामुळे या निवडणुकीने पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि रणनितीवर शिक्कामोर्तबच केल्याचे मानले जाते. या निवडणुकीत महायुतीचाच डंका वाजला असून महाविकास आघाडीमध्ये आता खऱ्या अर्थाने बिघाडीला सुरुवात झाल्याचेही स्पष्ट संकेत या निवडणुकीने दिल्याचे चित्र एव्हाना स्पष्टच झाले. (Vidhan Parishd Election Result)

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडून शिवसेनेच्या भावना गवळी (२४ मते) आणि कृपाल तुमाने (२५ मते) यांचा विजय झाला. खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे प्रत्यक्षात ४६ च मते होती. त्यात आणखी ३ मते शिवसेना उमेदवारांना मिळाली. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आमदारांनी एकजूट दाखवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवलाच, पण इतर तीन अतिरिक्त आमदारांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाला समर्थन दिल्याने एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाल्याचेही स्पष्ट झाले. (Vidhan Parishd Election Result)

(हेही वाचा – Nawab Malik यांच्या जामीनाला दोन आठवड्यांची मुदतवाढ)

महाविकास आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर

महायुतीतील भाजपाचे योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके आणि सदाभाऊ खोत यांना प्रत्येकी २६ मते मिळाली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर यांना २३ मते आणि शिवाजीराव गर्जे यांना २४ मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसकडेही ४२ मते पक्की होती. त्यात त्यांना ५ अतिरिक्त मते मिळाली. आणि हिच मते काँग्रेसकडून खेचून आणण्यात अजितदादा ही यशस्वी झाल्याने लोकसभेतील पक्षाचा झालेला पराभव या निकालाने काही अंशी धुवून काढण्यात यश मिळवल्याचे मानले जाते. (Vidhan Parishd Election Result)

काँग्रेसकडे ३२ मते होती. त्यातील २५ मते प्रज्ञा सातव यांना मिळाली. काँग्रेसची पहिल्या पसंतीची ७ मते फुटल्याचा संशय असून त्यानिमित्ताने महाविकास आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर आल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादी शरद पवार गटाने शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर उबाठाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. यात तब्बल २३ मतांसह नार्वेकर यांचा विजय झाला तर जयंत पाटील यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांचे नार्वेकर हे दुसऱ्या पंसतीच्या मतांनी निवडून आले आहेत. त्यांना विजयासाठी प्रतिक्षा करावी. (Vidhan Parishd Election Result)

(हेही वाचा – प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा; Monsoon Session चे सूप वाजले)

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने फेक नरेटिव्हमधून मतदारांची दिशाभूल केली होती. आणि याच निवडणुकीत अनपेक्षित ३१ जागा मिळाल्याने मविआला तात्पुरती आलेली सूज विधान परिषदेच्या निकालानंतर मात्र उतरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे सर्वसमावेशक नेतृत्वावर महायुतीबरोबरच अपक्ष आमदारांनी विश्वास दाखवला. विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेली राजकीय रणनिती यशस्वी ठरली आणि महायुतीचे उमेदवार अतिरिक्त मतांसह विजयी झाले. (Vidhan Parishd Election Result)

महायुती अभेद्यच….! तर आमदार फोडण्याची उद्धव ठाकरे यांची वल्गनाच

निवडणुकीपूर्वी उबाठाकडून महायुतीचे आमदार फोडणार, असे फेक नरेटिव्ह सातत्याने पसरवण्यात आले. मात्र महायुती अभेद्य असल्याचे आजच्या निवडणुकीने दिसून आले. तर शिवसेनेचे आमदार फुटणार, या उबाठाच्या वल्गनाच ठरल्या. काँग्रेस पक्षाची ७ मते फुटल्यानंतर महाविकास आघाडीतील बिघाडी मात्र यानिमित्ताने समोर आली. (Vidhan Parishd Election Result)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.