Vidhan Parishad Election : विधानसभेआधी विधान परिषद निवडणुकीच्या जागांसाठी रस्सीखेच सुरू

156
Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या चार जागांसाठी बुधवारी मतदान

राज्यसभेनंतर विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, येत्या शुक्रवार, दि. १२ जुलै रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. तर मंगळवार, दि. २ जुलै अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. १६ जुलैच्या आधी ही मतदान प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ११ सदस्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ येत्या २७ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. (Vidhan Parishad Election)

निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून या निवडणुकीत लोकसभेच्या निकालाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल विरोधात गेल्याने महायुतीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. अशातच विधानसभा निवडणुकीच्या अनेक आमदार कुंपणावर असल्याने गुप्त मतदानामुळे विधान परिषद निवडणुकीत सर्व पक्षांना क्रॉस वोटिंगची भीती सतावत आहे. (Vidhan Parishad Election)

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर प्रथमच विधान परिषदेची निवडणूक होत आहे. जेमतेम १५ दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. हा निकाल भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या विरोधात गेल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. अशातच शरद पवार आणि उबाठा गटाकडून सोडून गेलेले आमदार संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे. या निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने अनेक आमदार विधानसभेची उमेदवारी निश्चित करूनच मतदान करण्याची भूमिका घेण्याची शक्यता आहे. (Vidhan Parishad Election)

(हेही वाचा – Vasai Murder Case: पीडित मुलीच्या आईने न्यायासाठी केली याचना; म्हणाली “मुझे मेरी बेटी की जान…”)

सध्या विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीचे २३ मते आवश्यक

यामध्ये आमदाराचे खासदार झालेल्या आमदारांचा राजीनामा, आमदारांचे निधन आणि अपात्रतेची कारवाई यामुळे विद्यमान विधानसभेतील संख्याबळ २८८ वरून २७४ वर आले आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी २३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. विधानसभेतील पक्षनिहाय संख्याबळ लक्षात घेता भाजपा आणि छोट्या मित्र पक्षाचे मिळून पाच, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. काँग्रेसचा एक उमेदवार आरामात निवडून येऊ शकतो. (Vidhan Parishad Election)

भाजपाने सहावा उमेदवार दिला किंवा अपक्षाला पुरस्कृत केले तर निवडणूक अटळ

पक्षांतर तसेच लोकसभेवर निवड यामुळे काँगेसच्या सहा आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ ३९ वर आले आहे. तर सुनील केदार यांना अपात्र ठरविण्यात आल्याने त्यांच्या मतदानाच्या हक्काविषयी संदिग्धता आहे. काँग्रेसने दुसरा उमेदवार दिला तर त्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेसला समाजवादी, एमआयएम, माकपा आदी पक्षांची मदत घ्यावी लागेल. तर शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोघांचा मिळून एक उमेदवार निवडून येऊ शकतो. भाजपाने सहावा उमेदवार दिला किंवा अपक्षाला पुरस्कृत केले तर विधान परिषदेची निवडणूक अटळ आहे. (Vidhan Parishad Election)

त्यातच शिवसेनेने लोकसभेमध्ये आपला चांगला स्ट्राइक रेट असल्याचे सांगत अधिकच्या जागांची मागणी करण्यास सुरुवात केली आहे तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केंद्रात आपल्याला मंत्रिपद न मिळाल्याने विधानसभेत एखादी वाढीव जागा मिळावी असा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपाने देखील लोकसभा निवडणुकीमध्ये नाराज नेत्यांना लवकरच विधान परिषदेवर घेण्याचे वचन दिलेले बरेच नेते रांग लावून वाट पाहत आहेत. अशा वेळेस जर निवडणूक गुप्त मतदानाने झाल्यास पूर्वीप्रमाणेच क्रॉस वोटिंग होण्याची भीती सर्वच राजकीय पक्षांना लागून राहिली आहे. (Vidhan Parishad Election)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.