Vidhan Parishad Election : कोकण पदवीधरसाठी भाजपा मनसे आमने-सामने ?

155
Vidhan Parishad Election : कोकण पदवीधरसाठी भाजपा मनसे आमने-सामने ?

लोकसभा निवडणुकीपुर्वी मनसेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदासाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती. मात्र, आता महाराष्ट्रातील विधानपरिषदेसाठी पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून त्यात भाजपा विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Vidhan Parishad Election)

कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपाचे निरंजन डावखरे हे दोन वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे याहीवेळी त्यांचा या मतदारसंघावर दावा निश्चित मानला जात होता. पण मनसेनं जाहीर केलेली पानसेंची उमेदवारी आणि लोकसभा निवडणुकीत मनसेचा महायुतीमध्ये झालेला समावेश यामुळे या मतदारसंघातली समीकरणं नव्याने जुळवली जाऊ शकतात अशी चर्चा आता सुरू झाली आहे. (Vidhan Parishad Election)

(हेही वाचा – Vizag Railway Station: विझांग म्हणजेच आताचे विशाखापट्टणम रेल्वे स्थानकाबाबत जाणून घेऊयात काही रंजक गोष्टी)

महाविकास आघाडीकडून कोकण पदवीधर मतदार संघासाठी अजूनही नाव जरी जाहीर झाले नसले तरीही जागा काँग्रेसच्या वतीने लढवली जाणार असल्याचे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मागेच बोलून दाखवले आहे. रत्नागिरी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश कीर हे नाव पदवीधर मतदारसंघात येणार असल्याचे देखील विश्वासनीय सूत्रांकडून कळत आहे. त्यामुळे या निवडणुकीला आता रंगत येणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. मनसेद्वारे आपला उमेदवार उभा केल्यामुळे याचा फायदा महाविकास आघाडीला किती होतो हे तर येणारा काळच ठरवेल. (Vidhan Parishad Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.