Vidhan Parishad Election: शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा!

269
Vidhan Parishad Election: शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा!
Vidhan Parishad Election: शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांची घोषणा!

लोकसभा निवडणूक संपल्यानंतर 26 जून रोजी होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election) ठाकरे गटाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून यासंदर्भात पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब (Anil Parab) तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर (J M Abhyankar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Vidhan Parishad Election)

निकाल कधी?

26 जूनला विधानपरिषद निवडणुकीचे (Vidhan Parishad Election) मतदान पार पडेल. त्यानंतर 1 जुलै रौजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांना 31 मे 7 जून या काळात उमेदवारी अर्ज भरता येतील. त्यानंतर 10 जूनपर्यंत या अर्जांची छाननी केली जाईल. 12 जून ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. (Vidhan Parishad Election)

कोण आहेत अनिल परब ?

अनिल परब हे शिवसेनेचे विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली होती. ते रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्रीही होते. अनिल परब हे 2012 आणि 2018 मध्ये विधानपरिषदेवर निवडून आले होते. त्यांना पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. (Vidhan Parishad Election)

कोण आहेत ज. मो. अभ्यंकर ?

ज. मो. अभ्यंकर हे उबाठाच्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष या पदांची धुरा अभ्यंकर यांनी सांभाळलेली आहे. त्यांना उबाठाने विधानपरिषदेच्या रिंगणात उतरवले आहे. (Vidhan Parishad Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.