मतदान संपले आता निकालाची प्रतीक्षा! चमत्कार घडणार की आकडे जिंकणार?

164

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अखेर २८५ आमदारांचे मतदान संपले, आता सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार जिंकल्यानंतर एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘आम्हाला फडणवीसांचा चमत्कार मान्य आहे’, असे म्हटले होते. त्यामुळे लगोलग आलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही मतसंख्या नसतानाही भाजपने पाचवा उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे या निवडणुकीतही फडणवीस चमत्कार करणार की मविआचे तिन्ही पक्ष त्यांच्याकडील बहुमताच्या आकड्यांच्या आधारे त्यांचे सहाही उमेदवार निवडून आणणार, हे येणाऱ्या तासाभरात स्पष्ट होणार आहे.

प्रसाद लाड की भाई जगताप? 

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या दोन आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतले होते, त्यामुळे मतमोजणी थांबवली होती, अखेर ९ तास मतमोजणी रखडली होती, त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने ही दोन्ही मते ग्राह्य धरली मात्र शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी मतपत्रिका घडी करून टाकली नाही, त्यामुळे त्यांचे मत बाद ठरवले होते. यावेळी सगळ्याच पक्षांनी अगदी सरावाने मतदान केल्याने मतदान प्रक्रियेच्या दरम्यान कोणत्याही पक्षाने आक्षेप घेतला नाही. त्यामुळे अखेरीस मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे, मात्र आता मतमोजणीच्या प्रक्रियेत कुणाची मते बाद ठरणार हेही पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड या दोघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. कारण दोन्ही उमेदवारांना निवडणूक आणण्यासाठी त्या त्या पक्षांनी जोरदार फिल्डिंग लावली होती.

(हेही वाचा Vidhan Parishad Election: हितेंद्र ठाकूर यांचे मत काँग्रेसला?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.