राष्ट्रवादी काॅंग्रेसने दगाफटका होऊ नये म्हणून आणखी 5 मतांची व्यवस्था केली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना आता प्रत्येकी 28 मतांचा कोटा देण्यात आला आहे. रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना 28 मतांचा कोटा देवून राष्ट्रवादीने दोघांचाही निवडून आणण्याचा मार्ग मोकळा केल्याची माहिती समोर येत आहे.