Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या अंतर्गत नाट्याचा पहिला अंक सुरू; विदर्भातील जागा वाटपावरून नाराजी नाट्य सुरू

76
Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या अंतर्गत नाट्याचा पहिला अंक सुरू; विदर्भातील जागा वाटपावरून नाराजी नाट्य सुरू
Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या अंतर्गत नाट्याचा पहिला अंक सुरू; विदर्भातील जागा वाटपावरून नाराजी नाट्य सुरू
विधानसभा जागा वाटपावरून मविआत नाराजीनाट्याला सुरूवात होणं हाच खर्‍या अर्थाने मविआच्या अंतर्गत नाट्याचा पहिला अंक सुरू होणं असं असुन दुसर्‍या टप्यात कदाचित धुसफुस चव्हाट्यावर येवुन निवडणुकीच्या तोंडावर कुठल्याही क्षणी राजकिय भुकंप होवु शकतो. (Vidhan Sabha Election 2024)
तु-तु-मै भुकंपाचा पहिला अंक – राम कुलकर्णी
कारण विदर्भात ठाकरे गटाने पाय ठेवु नये याची पुर्णत: प्लॅनिंग काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले करत असुन पटोले आणि संजय राऊत यांच्यात सुरू झालेले तु-तु-मै भुकंपाचा पहिला अंक असल्याचा दावा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला. जागा वाटपावरून विदर्भाची चर्चा बैठकीतून उठून बाहेर पडण्यापर्यंत जेव्हा जाते तेव्हा प्रदेश काँग्रेसला ठाकरे गट नको असल्याचे सिद्ध होत असल्याचीही टिका त्यांनी केली. (Vidhan Sabha Election 2024)
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले की, महाविकास आघाडी सहभागी असलेल्या प्रमुख तीन घटक पक्षात अंतर्गत प्रचंड नाराजी असुन या मंडळींनी विधानसभा निवडणुक पुर्वरंगात सत्ताधार्‍यांच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी खोटे नाटे आरोप करत प्लॅनिंग केली असली तरी निवडणुकीला प्रत्यक्ष सामोरे जाताना जागावाटप हाच खराखुरा प्रत्येकाच्या ईगोचा आहे. लोकसभा निवडणुकीचं श्रेय शरद पवारांसह उद्धव ठाकरे स्वत:कडे जास्त घेत असल्याने आणि काँग्रेसवाले आमच्यामुळेच राज्यात मविआला यश मिळत असल्याचा दावा करत असल्याने सुरू झालेली अंतर्गत तु-तु-मै त्याचाच एक भाग म्हणावा लागेल. (Vidhan Sabha Election 2024)
एक तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची खुर्ची हवी त्यासाठी प्रदेश काँग्रेसला विश्वासात न घेता संजय राऊत दुतामार्फत थेट राहुल गांधी यांच्याशी सलगी वाढवल्याचं चित्र सहा महिन्यापासुन समोर आलं असून काँग्रेस नेते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांना सहन न होण्या पलीकडचं वाटतं. अर्थात शरद पवारांना देखील ते रूचणार नाही तो भाग वेगळा. विधानसभा निवडणुकीत जागावाटपासाठी ही मंडळी एकत्र बसली असताना पटोले आणि संजय राऊत यांच्यात भरल्या बैठकीत प्रचंड वाद झाल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला. विदर्भात आमची जास्त ताकद असुन ठाकरे गटांनी इथे पाऊल टाकु नये हीच भुमिका पटोलेंनी घेतली ज्यामुळे पटोले बैठकीतून तात्काळ बाहेर पडले. (Vidhan Sabha Election 2024)
विदर्भातील ६२ जागांपैकी ४५ जागांवर काँग्रेसने दावा केल्याने शिवसेना ठाकरे पक्ष आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विदर्भातून काँग्रेसकडे ६२ जागांसाठी ४०० हून अधिक इच्छुकांचे अर्ज आले आहेत.लोकसभा निवडणुकीत अमरावती, रामटेक या हक्काच्या जागा सोडल्याने विदर्भातील विधानसभेच्या जागा मिळाव्यात, असा आग्रह शिवसेना ठाकरे पक्षाने धरला आहे. तर वर्ध्याची जागा शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ने जिंकल्याने त्यांनीही १० ते १२ जागांवर दावा केला आहे. दसऱ्यापूर्वी जागावाटप पूर्ण करण्याचे महविकास आघाडीने निश्चित केले आहे. (Vidhan Sabha Election 2024)
महाविकास आघाडीतील जवळपास ८० टक्के जागांवरील तिढा सुटल्याचे पक्षातील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात वेगळेच चित्र असून मुंबई व परिसरातील मतदार संघाच्या जागावाटपात शिवसेना ठाकरे गटाने नमते न घेतल्याने काँग्रेस नेत्यांनी विदर्भातील ६२ पैकी किमान ४५ जागा लढविण्याचा हट्ट धरला आहे. शिवसेना ठाकरे पक्षाला विदर्भातून दुहेरी आकड्यातील जागांची अपेक्षा आहे तर, राष्ट्रवादीचीही १२ ते १५ जागांवर नजर आहे. (Vidhan Sabha Election 2024)
मात्र, विदर्भात हमखास यश मिळण्याची खात्री असल्याने काँग्रेस नेत्यांची जागा सोडण्याची तयारी नाही. विशेषतः, २०१९ मध्ये शिवसेनेने लढविलेल्या जागांवर काँग्रेसने दावा केला आहे आणि त्या जागा सोडण्यास त्यांची तयारी नाही. मात्र, त्यातही या जागांचा तिढा न सुटल्यास त्याबाबत वरिष्ठ पातळीवरच निर्णय होण्याची शक्यता आहे. (Vidhan Sabha Election 2024)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.