Vidhan Sabha Election 2024: ‘बर्फातले प्राणी…’, वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेची बॅनरबाजी!

172
Vidhan Sabha Election 2024: 'बर्फातले प्राणी...', वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेची बॅनरबाजी!
Vidhan Sabha Election 2024: 'बर्फातले प्राणी...', वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेची बॅनरबाजी!

लोकसभा निवडणूक निकालानंतर (Lok Sabha Election result 2024) आणि विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर उबाठा गट आणि मनसे असा सामना रंगताना दिसत आहे. कारण आता वरळीत मनसे विरुद्ध आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने पोस्टरबाजी (MNS posters) केली आहे. (Vidhan Sabha Election 2024)

संदीप देशपांडे निवडणूक लढवण्याची शक्यता

या पोस्टरवर आदित्य ठाकरेंना विधानसभेत पाडण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मनसे कार्यकर्ते हर्षल खरात यांनी हे बॅनर लावले आहेत. याच पोस्टरच्या माध्यमातून विधानसभेसाठी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना जिंकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाचे वरळी विधानसभेतील (Worli Vidhan Sabha) विद्यमान आमदार आहेत. यंदा त्यांच्याविरोधात मनसेकडून संदीप देशपांडे हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. (Vidhan Sabha Election 2024)

वरळीतील पोस्टर्सवर नेमकं काय?

वरळीत मनसेने आदित्य ठाकरे यांच्याविरोधात पोस्टर्स लावले आहेत. त्या पोस्टर्सवर आदित्य ठाकरेंविरोधात उल्लेख करण्यात आला आहे. ‘बर्फातला प्राणी बर्फातच पाठवूया, जनमनातला आमदार, संदीप वरळीत आणूया. वरळीचे भावी आमदार संदीप देशपांडे, सन्माननीय राज ठाकरे यांचा विश्वासू शिलेदार विधानसभेत पाठवूया यंदा वरळीकरांचं ठरलंय’, असं या पोस्टर्सवर लिहिलं आहे. (Vidhan Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.