Vidhan Sabha Election 2024 : बैठकांचे सत्र आणि जागा वाटपावरून रस्सीखेच

Vidhan Sabha Election 2024 : विधानसभेचा धुरळा; राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध, अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी चढाओढ

162
Vidhan Sabha Election 2024 : बैठकांचे सत्र आणि जागा वाटपावरून रस्सीखेच
Vidhan Sabha Election 2024 : बैठकांचे सत्र आणि जागा वाटपावरून रस्सीखेच
  • सुजित महामुलकर

दहा दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक पार पडली आणि सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले. आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणूक जागावाटपाची चर्चाही सुरू झाली असून पुढील काही दिवस अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी रस्सीखेच अशीच सुरू राहील. राज्यात किमान आठ प्रमुख राजकीय पक्ष असल्याने काही विद्यमान, काही माजी आमदार तर काही माजी खासदारही सोयीस्कर पक्षबदल करण्याच्या तयारीत असून काहींनी वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटीही सुरू केल्याची चर्चा आहे.  (Vidhan Sabha Election 2024)

(हेही वाचा- Guru Purnima 2024 : गुरुंना वंदन करण्याचा पवित्र दिवस – गुरु पौर्णिमा; जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व)

२०१९ नंतर राजकीय बदल

राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघ असून युती आणि आघाडीला या आकड्यावरच गणिते जुळवावी लागणार आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती एकत्र निवडणुकीला सामोरी गेली होती. मात्र निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणाचे चित्रच कधी नव्हते इतके बदलले. आता एकाच्या दोन शिवसेना झाल्या आहेत तर राष्ट्रवादीची दोन शकले झाली आहेत. इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे हे कॉंग्रेस-राष्ट्रवादीला (शरदचंद्र पवार गट) सोबत घेऊन विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. (Vidhan Sabha Election 2024)

महाविकास आघाडी आत्मविश्वासला तडा

मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी ३१ जागी यश मिळल्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला दिसत आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फुटल्याने या आत्मविश्वासाला तडा गेला. (Vidhan Sabha Election 2024)

(हेही वाचा- Hardik Pandya : भारतीय संघाचं नेतृत्व गेलं, आता हार्दिकसाठी मुंबई इंडियन्सचं नेतृत्वही दुरापास्त?)

बैठकांचे सत्र

दुसरीकडे, विधान परिषद निवडणुकीत सर्व नऊ उमेदवार विजयी झाल्यामुळे महायुतीचा लोकसभेनंतर घसरलेला आलेख थोडा सावरला गेला. महायुतीतील मोठा पक्ष, भाजपाने, कोअर कमिटीच्या बैठकांचे सत्र सुरू केले असून राज्यातील भाजपाचा चेहेरा असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार दिवसांपूर्वी दिल्लीवारी केली. राज्यातही बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गुरुवारी शिवसेना आमदार, खासदार, मंत्र्यांची बैठक ‘वर्षा’ निवासस्थानी बोलावली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांनीही राज्यव्यापी दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनीही जोर ‘बैठकांना’ सुरुवात केल्याचे दिसते. (Vidhan Sabha Election 2024)

उबाठाच्या ‘दादा’गिरीला मूरड

महाविकास आघाडीतील राष्ट्रीय पक्ष असलेल्या कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाठापेक्षा कमी जागा लढून अधिक जागा निवडून आणण्याचा चमत्कार केला आणि आपणाची मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले तर महाविकास आघाडीत सगळ्यात कमी जागा लढून, उमेदवार निवडून आणण्याचा सर्वाधिक ‘स्ट्राइक रेट’ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा होता. या तुलनेत शिवसेना उबाठा मागे पडला. आता लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या जागावाटपात शिवसेना उबाठाने ‘दादा’गिरी करण्यास सुरुवात केली असून मुंबईतील ३६ पैकी २५ जागांची मागणी करत असल्याच्या चर्चा आहेत तसेच राज्यातही १०० पेक्षा अधिक जागांवर दावा करत असल्याचे बोलले जात आहे. लोकसभेच्या निकालानंतर उबाठाचा ‘स्ट्राइक रेट’चा विचार करता विधानसभेच्या जागावाटपात उबाठाला सर्वाधिक जागा लढण्याची संधी मिळेल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. यावरून पुढील काही दिवस शिवसेना उबाठा आणि कॉंग्रेसमधील वाकयुद्ध रंगणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  (Vidhan Sabha Election 2024)

(हेही वाचा- RTE नुसार पुढील शैक्षणिक वर्षासाठी मुंबईतील २५ टक्के आरक्षित जागांसाठी ४७३५ विद्यार्थ्यांची निवड)

कॉंग्रेसमध्येही धूसफूस

शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फूटीमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर उमेदवार निवडीत सक्तीने नव्या चेहेऱ्यांना संधी द्यावी लागणार आहे. शिवसेनेतील ५६ पैकी ४० तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ५४ पैकी ४० आमदार एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत गेल्याने जूने, अनुभवी आमदार उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे राहिले नाहीत. कॉंग्रेसमध्येही फार आलबेल आहे असा भाग नाही. विधान परिषद निवडणुकीवेळी कॉंग्रेसमधील अंतर्गत धूसफूस चव्हाट्यावर आलीच. (Vidhan Sabha Election 2024)

वैचारिक मतभेद कायम

महायुतीतही अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये अंतर्गत वाद आहेत. त्यवार वेळीच तोडगा काढता आला नाही तर महायुतीलाही बंडखोरीचा सामना करण्याची वेळ येऊ शकते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुखपत्रे ‘ऑर्गनाइजर’ आणि ‘विवेक’ यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवरून भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याबाबतचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. या लेखांमध्ये व्यक्त करण्यात आलेले निरीक्षण तथ्यहीन आहे, असे म्हणता येणार नाही. भाजपा आणि शिवसेना ही युती नैसर्गिक असल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला युतीत स्वीकारले गेले हे प्रमुख कारण. तर शिंदे यांनी सत्तेत असताना पक्षातून बाहेर पडत ठाकरे सरकार उलथावले आणि भाजपासोबत सरकार स्थापन केले. भाजपा-सेनेचे १८०-१८५ आमदारांचे स्थिर सरकार असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सरकारमध्ये सामावून घेण्यासाठी ‘शरद पवारांना मोठा धक्का’ देण्याव्यतिरिक्त बाकी प्रबळ कारण नव्हते. सरकारमध्ये असूनही वैचारिक पातळीवर भाजपा-सेना आणि राष्ट्रवादी यांच्यात मनमोकळेपणा दिसून येत नाही. (Vidhan Sabha Election 2024)

(हेही वाचा- Mohammed Shami : ‘माझ्याकडून आणखी काय अपेक्षा आहेत,’ असं शमी बीसीसीआयला का विचारतोय?)

लोकशाही जिवंत

एकूणच काय तर आता विधानसभेचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. सरकारकडून एकावर एक घोषणांचा पाऊस तर विरोधकांकडून चांगल्या योजनांमध्ये खोडा घालण्याचे प्रयत्न कायम ठेवत लोकशाही जिवंत असल्याचे दाखले देण्याची उठाठेव पुढे तीन महीने तरी मतदारांना पाहावयास मिळणार आहे.  (Vidhan Sabha Election 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.