विधानसभेत लक्षवेधी सूचना संपल्यानंतर ११ वाजता प्रश्नोत्तराचा तास सुरू होणार होता. त्यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले मध्येच उठून अन्य प्रश्नावर बोलू लागल्याने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना सभागृहाचा नियम समजावत गप्प केले.
…अन् पटोले गडबडून गेले
विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासाला सुरुवात होत असताना माजी अध्यक्ष नाना पटोले मध्येच उठले आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू लागले, त्यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लगेच त्यावर हरकत घेत, आपण हा मुद्दा पॉइंट ऑफ प्रोसिजर म्हणून मांडत आहात की पॉइंट ऑफ इन्फर्मेशन म्हणून, अशी विचारणा केली. त्यावर तत्कालीन अध्यक्ष पटोले गडबडून गेले. मी हा मुद्दा पॉइंट ऑफ प्रोसिजर म्हणून मंडणारच होतो, पण राज्यात एका २९ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घरात घेत आत्महत्या केली आहे, सध्या आपले अधिवेशन सुरू आहे, यावर चर्चा होणे आवश्यक आहे, असे मला वाटते, अशी सारवासारव केली.
(हेही वाचा – मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री)
मात्र, शेतकऱ्यांच्या विषयावर आधीच विरोधी पक्षाचा प्रस्ताव असताना तुम्ही यावर आता का बोलत आहात, असे विचारत अध्यक्ष नार्वेकर यांनी माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना, सभागृहातच पॉइंट ऑफ प्रोसिजर आणि पॉइंट ऑफ ऑर्डर काय असते, याबाबत माहिती दिली. तसेच अवेळी उपस्थिती केलेला मुद्दा कसा कामकाजाच्या नियमात बसत नाही, असे सांगत गप्प केले.
Join Our WhatsApp Community