Vidhanasabha Election 2024 : विधानसभेआधी मुंबई भाजपामध्ये होणार मोठे फेरबदल? काहींचा होणार पत्ता गुल…

149
Vidhanasabha Election 2024 : विधानसभेआधी मुंबई भाजपामध्ये होणार मोठे फेरबदल? काहींचा होणार पत्ता गुल...
Vidhanasabha Election 2024 : विधानसभेआधी मुंबई भाजपामध्ये होणार मोठे फेरबदल? काहींचा होणार पत्ता गुल...
  • मुंबई प्रतिनिधी 
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) भाजपाची राज्यातील कामगिरी अत्यंत अपेक्षित राहिली. राज्यात भाजपाला एकूण १४ जागांवर थेट फटका बसला. परिणामी आगामी विधानसभा निवडणुकीआधी भाजपाने (BJP) मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे.विशेषकरुन मुंबई भाजपामध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. (Vidhanasabha Election 2024)
मुंबईतील काही जिल्हाध्यक्षांची होणार उचल बांगडी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई भाजपमध्ये (BJP) मोठे बदल होणार आहेत. जिल्हाध्यक्षांसह काही प्रमुख पदाधिकारी बदलणार आहेत. काही जिल्हाध्यक्षांची कामगिरी समाधानकारक नाही तर काहींना बढती देण्यात येणार असल्यामुळे मुंबई भाजपमध्ये हे बदल होणार असल्याची माहिती आहे. जिल्हाध्यक्षपदी काही तरुणांना संधी देणार असल्याचेही समजत आहे. येत्या आठवड्याभरात मुंबई भाजपमध्ये हे फेरबदल होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. (Vidhanasabha Election 2024)
यामुळे विधानसभेला विशेषता मुंबईमध्ये भाजपाला (BJP) अपेक्षित यश मिळू शकते असे मत भाजपाच्या काही बड्या नेत्यांचे झाले आहे. यासंदर्भात भाजपाचा वरिष्ठ नेत्यांमध्ये सध्या खलबते सुरू आहेत. (Vidhanasabha Election 2024)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.