VidhanParishad Election 2024 : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक, मतदानाला सुरूवात

105
VidhanParishad Election 2024 : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक, मतदानाला सुरूवात
VidhanParishad Election 2024 : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज निवडणूक, मतदानाला सुरूवात

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी (१२ जुलै) होणारी निवडणूक (VidhanParishad Election 2024) चुरशीची ठरणार आहे. कारण 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असून, सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर असे 5 उमेदवार, शिवसेनेकडून कृपात तुमाने आणि भावना गवळी असे 2 उमेदवार, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर असे 2 उमेदवार, काँग्रेसकडून प्रज्ञा राजीव सावत, ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर आणि शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर शेकापचे जयंत पाटील असे एकूण 12 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. (VidhanParishad Election 2024)

(हेही वाचा –MPSC : अतिवृष्टीमुळे अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांकरिता ‘या’ दिवशी होणार टंकलेखन कौशल्य चाचणी)

विधानपरिषद निवडणुकीत 274 आमदार मतदान करणार आहेत. एका उमेदवाराला विजयासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आलाय. महायुतीकडे 197 आमदारांचं संख्याबळ असून, त्यांचे 9 उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडे 69 आमदाराचं संख्याबळ असून, त्यांचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. (VidhanParishad Election 2024)

भाजपकडे 103 आमदार आहेत. 5 उमेदवार निवडून आणण्यासाठी 115 मतांची गरज आहे. वरच्या 12 मतांसाठी भाजपला मित्रपक्ष आणि अपक्षांवर अवलंबून राहावं लागणाराय. 5 अपक्ष आमदार आणि इतर 7 आमदारांनी भाजपच्या पारड्यात मतं टाकल्यास भाजपचे पाचही उमेदवार जिंकू शकतात, असा अंदाज आहे. (VidhanParishad Election 2024)

(हेही वाचा –SSC-HSC Exam Hall Ticket : १० वी, १२ वीच्या परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन मिळणार)

शिवसेना शिंदे गटाकडे 38 आमदार आहेत. 2 उमेदवार निवडून आणण्यासाठी 46 मतांची गरज आहे. वरच्या 9 मतांसाठी शिवसेना शिंदे गटाला तजवीज करावी लागणाराय. 6 अपक्ष आमदार आणि बच्चू कडूंच्या पक्षाच्या 2 आमदारांची मतं मिळाल्यास मुख्यमंत्र्यांचे दोन्ही उमेदवार विजयी होऊ शकतील, अशी शक्यता आहे. (VidhanParishad Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.