राष्ट्रवादीच्या ‘त्या’ ३ आमदारांमुळे धाकधूक वाढली; अद्याप मुंबईत पोहोचलेच नाहीत!

158

राज्याच्या विधान परिषदेच्या 10 जागांची निवडणूक सोमवारी होत असून दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजपा चमत्कार घडवणार याबाबत उत्सुकता लागली आहे. विधानपरिषद निवडणुकीचे मतदान सुरू झाले असून सर्वपक्षीय आमदार विधानभवनात दाखल होत आहे. असे असताना राष्ट्रवादीच्या ३ आमदारांनी पुन्हा धाकधूक वाढवल्याचे पाहायला मिळत आहे. मतदानाची वेळ जवळ आली तरी राष्ट्रवादीचे तीन आमदार अद्याप मुंबईत दाखल झाले नाहीत.

या तीन आमदारांमध्ये खेडचे आमदार दिलीप मोहिते, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. हे तीन आमदार मुंबईत मतदानासाठी अद्याप दाखल झाले नसले तरी पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय

(हेही वाचा – महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडेल, चंद्रकांत पाटलांचा दावा)

या प्रकारानंतर राष्ट्रवादीकडून असे सांगितले जात आहे की, मतदानाचा कालावधी संपण्यापूर्वी हे तीनही आमदार मुंबईत दाखल होतील. अण्णा बनसोडे हे प्रकृतीच्या कारणास्तव मुंबईत पोहोचले नाही तर आशुतोष काळे हे स्थानिक निवडणुकांमध्ये व्यस्त आहे, त्यामुळे ते पोहोचू शकले नाही. परंतु दिलीप मोहिते पाटील यांच्या बद्दल अजूनही कोणतीही अपडेट नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्यावेळी हे आमदार वेळेवर पोहोचले नव्हते त्यामुळे आजतरी ते वेळेवर पोहोचणार का याकडे विरोधकांचे लक्ष लागून आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.