Vidhansabha Election 2024 : मुंबईत यंदा किती आहेत नवीन मतदार ?

158
Vidhansabha Election 2024 : मुंबईत यंदा किती आहेत नवीन मतदार ?
Vidhansabha Election 2024 : मुंबईत यंदा किती आहेत नवीन मतदार ?

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील मतदारांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असून मुंबईत एकूण १ कोटी १ लाखाहून अधिक मतदार विधानसभेच्या निवडणुकीत मत नोंदवणार आहेत, तर १ लाख ६० हजार नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नवमतदारांपैकी ४७ लाख महिला असून सर्वाधिक महिला मतदार मालाडमध्ये आहेत. तृतीयपंथी मतदारांची संख्या वाढत असून यंदा १,०७६ तृतीयपंथी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी उपनगरात ८३२ तृतीयपंथी मतदार आहेत. सर्वाधिक तृतीयपंथी मतदार मालाड पश्चिममध्ये आहेत. (Vidhansabha Election 2024)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024: मविआत फूट? आदित्य ठाकरे शरद पवारांच्या भेटीला, ठाकरेंनी बोलावली आमदारांची तातडीने बैठक)

मुंबईत एकूण ४७ लाख महिला मतदार आहेत. प्रत्येक मतदारसंघात महिला मतदारांची संख्या १ लाख १२ हजार आहे. मात्र मालाड पश्चिममध्ये महिला मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजेच १ लाख ६७ हजार ७०७ इतकी आहे. वडाळ्यामध्ये एकूणच मतदारांची संख्या कमी असून या मतदारसंघातील महिला मतदारांची संख्याही कमी आहे. या मतदारसंघात ९९ हजार ५५३ महिला मतदार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण ३६ विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी १० विधानसभा मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात, तर २६ विधानसभा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी यंदा १ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात ४७ लाख महिला, तर ५४ लाख पुरुष मतदार आहेत. मुंबईत सर्वाधिक मतदार उपनगरातील चांदिवली परिसरात आहेत, तर सर्वात कमी मतदार शहर भागातील वडाळा परिसरात आहेत. (Vidhansabha Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.