उत्तर प्रदेशातील विधानसभेत (Vidhansabha) एक आमदार चक्क पान मसाला खाऊन थुंकल्याची घटना घडली, हा प्रकार पाहून विधानसभा अध्यक्ष चांगलेच संतापले. लोकशाहीच्या मंदिरात हा घृणास्पद प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी, एका आमदाराने पान मसाला खाल्ला आणि सभागृहात थुंकले. विधानसभा अध्यक्षांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि ते अनुशासनहीन असल्याचे म्हटले. मी व्हिडिओमध्ये हे कोणी केले ते पाहिले आहे, परंतु मी कोणत्याही सदस्याचे नाव घेणार नाही, असे विधानसभा (Vidhansabha) अध्यक्ष सतीश महाना म्हणाले. विधानसभेच्या अध्यक्षांनी गंभीर स्वरात सांगितले की, असे वर्तन सभागृहात अजिबात स्वीकारार्ह नाही. आज सकाळी मला कळले की आमच्या सभागृहातील सदस्याने पान मसाला खाल्ला आणि तिथे थुंकले. मी येऊन ते स्वच्छ केले. हे कोणी केले याचा व्हिडीओ मी पाहिला आहे, पण मला कोणाचाही अपमान करायचा नाही.
(हेही वाचा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; BEST Bus मधील अशुद्ध मराठी सूचनांमुळे मराठी भाषाप्रेमींमध्ये संताप!)
विधानसभा (Vidhansabha) अध्यक्ष सतीश महाना पुढे म्हणाले की, विधानसभा ही कोणत्याही एका व्यक्तीची नाही तर ४०३ आमदारांची आणि उत्तर प्रदेशातील २५ कोटी जनतेची आहे. ते स्वच्छ आणि प्रतिष्ठित ठेवणे ही सर्व सदस्यांची जबाबदारी आहे. ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांची ओळख पटली आहे. जर ते स्वतः पुढे येऊन त्यांची चूक मान्य करेल तर ठीक आहे, नाहीतर मला त्यांना बोलावावे लागेल. सभापतींनी सदस्यांना आवाहन केले आणि सांगितले की, जर कोणत्याही आमदाराने त्यांच्या सहकाऱ्याला असे कृत्य करताना पाहिले तर त्यांनी त्यांना त्वरित असे करण्यापासून रोखावे, असेही अध्यक्ष महाना म्हणाले.
Join Our WhatsApp Community