Vidhansabha Monsoon Session : एक अकेला मोदी सब पे भारी! विधानभवनाबाहेर सत्ताधाऱ्यांकडून इंडि आघाडीविरोधात बॅनरबाजी

85
Vidhansabha Monsoon Session : एक अकेला मोदी सब पे भारी! विधानभवनाबाहेर सत्ताधाऱ्यांकडून इंडि आघाडीविरोधात बॅनरबाजी
Vidhansabha Monsoon Session : एक अकेला मोदी सब पे भारी! विधानभवनाबाहेर सत्ताधाऱ्यांकडून इंडि आघाडीविरोधात बॅनरबाजी

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Vidhansabha Monsoon Session) आज दुसरा दिवस आहे. आज अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प मांडणार असून विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच महिन्यांवर असल्याने अंतरिम अर्थसंकल्पात अनेक बड्या घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच विधानभवनाच्या (Vidhan Bhavan) पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचे दिसून आले आहे. (Vidhansabha Monsoon Session)

हरल्याचे पेढे घ्या…

विधिमंडळ अधिवेशनाचे आजचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांनी हातात बॅनर घेत ‘एक मोदी, सब पे भारी’, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) समर्थनार्थ यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. ‘घ्या ओ घ्या… विरोधी पक्ष नेत्याचे नाही तर हरल्याचे पेढे घ्या…! असा आशयाचाही बॅनरवर उल्लेख होता. शिवसेना (Shiv Sena) आमदारांकडून ही बॅनरबाजी करत इंडि आघाडीविरोधात (Indi Aghadi) आंदोलन करण्यात आले. (Vidhansabha Monsoon Session)

अबकी बार महाराष्ट्रातील उद्योगधंदे सीमापार

त्यानंतर सत्ताधारी आंदोलन करत असतानाच त्यांच्या पुढे विरोधक उभे राहिले आणि त्यांनीही राज्यातील महायुती सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत आंदोलन सुरू केले. अबकी बार महाराष्ट्रातील उद्योगधंदे सीमापार,शेतकऱ्यांची वीज बिल माफ केली पाहिजे, असा आशयाचे बॅनर झळकावत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गट आमदारांनी गाजराच्या माळा हातात घेऊन सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (Vidhansabha Monsoon Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.