कर्ज बुडवणारे माल्ल्या-मोदीला भारताच्या स्वाधीन करणार! बोरिस जॉन्सन यांचे आश्वासन

148

भारतातील कोट्यवधींचे कर्ज बुडवून नीरव मोदी आणि विजय माल्या परदेशात पळाले आहेत. त्यांना भारताच्या स्वाधीन करण्याची घोषणा इग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शुक्रवारी, २२ एप्रिल रोजी केली. दोन दिवसीय भारत दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान जॉन्सन यांनी पत्रकारांना संबोधित करताना ही घोषणा केली.

रशिया-युक्रेन युद्धाबाबतही सविस्तर चर्चा

यासंदर्भात पंतप्रधान जॉन्सन म्हणाले की, या दोघांनाही भारताच्या स्वाधीन करायचे आहे. कारण कायदा चुकवून जे लोक आपल्या देशात येतात, त्यांचे स्वागत आम्हाला कधीच करणार नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच माल्ल्या आणि मोदीला भारतात परत पाठवायचे असून कायदा चुकवून जे लोक आपल्या देशात येतात त्यांच्यावर योग्य ती कारवाई करु, असेही जॉन्सन यांनी स्पष्ट केले. याशिवाय जॉन्सन यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबतही सविस्तर चर्चा केली. ते म्हणाले की, पुढील आठवड्यापासून कीवमध्ये पुन्हा एकदा यूके दूतावास उघडला जाईल. मारियुपोलमध्ये ज्या पद्धतीने कारवाई केली गेली, ती पूर्णपणे रशियाच्या विरोधात जाते. पण तरीही आता आम्ही पुन्हा कीवमध्ये आमचा दूतावास उघडणार आहोत. भारताच्या भूमिकेबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता, भारताचे रशियाशी जुने संबंध आहेत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. रशियाबाबत भारताची भूमिका सर्वांना माहिती आहे. भविष्यात त्यात कोणताही बदल होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा मुंबईत राणा दाम्पत्य आक्रमक, अमरावतीतील शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचे अस्तित्व धोक्यात)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.