Shiv Sena विजय शिवतारेंवर कारवाई करणार?

शिवतारे यांनी शरद पवार तसेच अजित पवार यांच्याविरुद्ध रणशिंग फुंकले असून बारामतीतून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. शिवतारे यांनी एकूणच पवार कुटुंबाविरुद्ध आघाडी उघडली आहे.

229
Shiv Sena विजय शिवतारेंवर कारवाई करणार?

राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेना (शिंदे) नेते विजय शिवतारे यांनी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) विरोधात भूमिका घेत उघड टीकाटिप्पणी केल्यामुळे, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेवर दबाव वाढत आहे. तसेच शिवतारे यांचा बोलविता धनी कोण आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. (Shiv Sena)

अप्रत्यक्ष फायदा महाविकास आघाडीला

शिवतारे यांनी शरद पवार तसेच अजित पवार यांच्याविरुद्ध रणशिंग फुंकले असून बारामतीतून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. शिवतारे यांनी एकूणच पवार कुटुंबाविरुद्ध आघाडी उघडली आहे. बारामतीत शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीच्या उमेदवार असून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार असतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे अगोदरच चुरशीच्या होणाऱ्या या लढतीत शिवतारे उतरल्यास त्याचा अप्रत्यक्ष फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. (Shiv Sena)

(हेही वाचा – Human Trafficking Racket : आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेट उध्वस्त; दोन जणांना अटक, चार भारतीयांची थायलंडमधून सुटका)

पाच वर्षे शिवतारे मुख्य राजकीय प्रवाहापासून दूर

२००९ आणि २०१४ मध्ये विधानसभेत निवडून गेलेले शिवतारे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी जाहीर आव्हान देऊन पराभूत केले. २०१४-२०१९ ला राज्यमंत्रिपद भूषवल्यानंतर परभवामुळे, गेली पाच वर्षे शिवतारे मुख्य राजकीय प्रवाहापासून दूर फेकले गेले. याचा राग शिवतारे यांच्या मनात खदखदत होता आणि आता संधी मिळताच तो बाहेर येत आहे, असे एका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्याने सांगितले. (Shiv Sena)

… तर त्यांच्याशी संबंध संपला

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी मंगळवारी त्यांच्यावर प्रतिक्रिया देताना आरोप केला की, शिवतारे यांचा बोलविता धनी वेगळा आहे आणि लवकरच ते समोर येईल. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेवर शिवतारे यांच्यावर कारवाई करण्यासाठी दबाव वाढत असून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवतारे हे शिवसेना शिंदे यांच्यासोबत असून त्यांचे वर्तन महायुतीच्या विरोधात असल्याने शिवसेनेची परिस्थिति अवघड झाली आहे. शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही कारवाईचे संकेत दिले असून शिवतारे यांनी निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केल्यास त्यांचा आणि आमचा (शिवसेना) संबंध संपेल, असा इशारा दिला आहे. शिवतारे यांनी १२ एप्रिलला १२ वाजता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे. (Shiv Sena)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.