विजय वडेट्टीवार… राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री. पण हे वडेट्टीवार गेल्या काही दिवसांत त्यांच्या वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. आता तर त्यांनी आपल्या मनातील खदखदच थेट बोलून दाखवली आहे. राज्याचा विरोधी पक्षनेता होतो, सत्ता आली त्यावेळेस महसूल मंत्रीपद तरी मिळेल असे वाटले होते. पण केवळ ओबीसी म्हणून मला ओबीसी खाते मिळाले, अशी खदखद विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवली आहे. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते. त्यांच्यासमोरच वडेट्टीवारांच्या मनातील खदखद बाहेर पडली.
म्हणून कमी दर्जाची खाती मिळतात
वडेट्टीवार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पंकजा मुंडेंनाही ग्रामीण विकास मंत्रीपद मिळाले असे सांगत आपण फक्त ओबीसी आहोत, म्हणून आपल्याला कमी दर्जाची मंत्रीपदे मिळतात, अशी खदखद बोलून दाखवली. आज लोणावळ्यात ओबीसींची परिषद भरली होती त्यावेळी ते बोलत होते. आजच्या समारोपाच्या कार्यक्रमात मंत्री वडेट्टीवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.
(हेही वाचाः ओबीसींचे खरे मारेकरी कोण? फडणवीस म्हणाले… )
आणखी काय म्हणाले वडेट्टीवार
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब, त्यांच्या कन्या, खरं तर मी मुंडे साहेबांचा शिष्य. मुंडे साहेबांच्या कन्या म्हणजे आम्ही गुरुबंधू. पंकजा ताई हा तोच वसा ओबीसी चळवळीत काम करुन पुढे चालवत आहेत, असं वडेट्टीवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community