राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहंत आहे. ठिकठिकाणी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सभा होत आहेत. अशातच काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आपल्या भाषणात मतदारांना शिवीगाळ केली आहे. त्यासंदर्भातील ४७ सेकंदाचा एक व्हिडिओ भाजपने एक्सवर पोस्ट केला आहे. तसेच विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या विधानवरून काँग्रेसला घेरण्यात आलं आहे. (Vijay Wadettiwar)
काँग्रेसचा हात, मतदारांचा घात
कॉंग्रेस नेते, @VijayWadettiwar मतदारांना हरा*खोर म्हणत आहे, 20 तारखेनंतर तुला पाहून घेइन, तुमचे नाव लिहून ठेवले आहेत. अशी धमकीच त्यांनी मतदारांना दिली आहे.
लोकशाहीत मतदार हा राजा असतो मात्र लोकशाही, संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा काँग्रेसला… pic.twitter.com/pfwi8apMi8
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 6, 2024
विजय वडेट्टीवार म्हणाले की, २० तारीख येऊ देत मग मी दाखवतो. मी माझ्या आयुष्यात कधी धमकी दिली नाही. तुमच्या तोंडात किडे पडतील हरामखोरांनो, एवढं खोटं बोलू नका भड****, लहान कार्यकर्ता असला तरी मी त्याच्याशी सन्मानाने वागतो. मी गावात गेलो तरी कोणाशी काही बोलत नाही. आणि ते नालायक हरामखोर मला बोलतात, असे वादग्रस्त विधान वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केले आहे.
( हेही वाचा : Financial Changes : नोव्हेंबरपासून क्रेडिट कार्डाचे शुल्क वाढणार, आणखी कोणते नियम बदलणार?)
दरम्यान विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपाने एक्सवर पोस्ट करत म्हटले की, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) मतदारांना हरा*खोर म्हणत आहे, २० तारखेनंतर तुला पाहून घेइन, तुमचे नाव लिहून ठेवले आहेत. अशी धमकीच त्यांनी मतदारांना दिली आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो मात्र लोकशाही, संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा काँग्रेसला सुरुवातीपासूनच तिटकारा आहे. ज्या काँग्रेसने संविधानाची पायमल्ली करत देशावर आणीबाणी लादली असंख्य सामान्य लोकांना तुरूंगात डांबून ठेवले ती काँग्रेस पुन्हा मतदारांना धमकवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राची जनता मतदानातून काँग्रेसची ही मस्ती नक्कीच उतरवणार, असे भाजपाने एक्सवर लिहत संताप व्यक्त केला आहे. (Vijay Wadettiwar)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community