अति सन्मानीय विजय वडेट्टीवार हे ओबीसी व भटके विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी निर्माण झालेल्या महाज्योती संस्थेला आपली जहागिर समजून मनमानी कारभार करत आहेत. महाज्योती संस्थेचा बट्ट्याबोळ व हस या प्रस्थापितांच्या सरकारने करून ठेवले आहे. ‘बड्या बड्या बाता आणि ‘धोरण’ खातंय लाथा’, अशी वडेट्टीवारांची गत झाली आहे. ओबीसी भटक्या विमुक्तांचा पुळका आल्याचे दाखवायचे आणि परत त्यांच्याच गळ्यावर सुरा फिरवायचा हे वडेट्टीवार यांचे धोरण राहिलेले आहे, अशा शब्दांत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हल्लाबोल केला.
सारथीकडून भत्ता महाज्योतीकडून का नाही?
MPSC व UPSC च्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महाज्योतीने परीक्षा घेतली, यातील पात्र विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे क्रमप्राप्त असताना महाज्योती संस्था स्पष्टपणे नकार देत आहे, मात्र दुसरीकडे सारथी संस्था व बार्टी संस्था आपल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतन देत आहे. सारथी आणि बार्टीकडून विद्यार्थ्यांना प्रतिमहिना १० ते २५ हजार निधी मिळतो. महाज्योती मात्र विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याच काम करत आहे, असाही आरोप पडळकर यांनी केला.
(हेही वाचा : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? ‘त्या’ रात्री काय घडले? राणेंनी केला धक्कादायक दावा)
ओबीसी विद्यार्थ्यांना वेगळा न्याय का?
सारथीच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीत मागच्या वर्षी आंदोलन केले, तर तीन दिवसात निधी देण्याची ग्वाही मंत्री वडेट्टीवार यांनी दिली होती. आता ओबीसी विद्यार्थ्यांना निधी देण्याची वेळ आली तर वडेट्टीवार कुठल्या बिळात जाऊन बसले आहेत. म्हणजे महाज्योती संस्था ही काय ओबीसी विद्यार्थ्यांचे भले करण्यासाठी निर्माण झाली आहे की, त्यांना त्रास द्यायला? हे वडेट्टीवारांनी स्पष्ट करावे. प्रस्थापितांच्या राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांना वेगळा न्याय का?, असा प्रश्न आमदार वडेट्टीवार यांनी केला.
Join Our WhatsApp Community