मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange) आंदोलनाला पूर्वीसारखी धार नाही, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar ) यांनी केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यासांठी मनोज जरांगेंनी दि. २५ जानेवारीपासून पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे. त्यावर वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नागपूर (Nagpur) येथे माध्यमांशी संवाद साधला. (Vijay Wadettiwar )
( हेही वाचा : अजमेर दर्ग्याखाली शिवमंदिर असल्याचा दावा करणाऱ्या Vishnu Gupta यांच्यावर गोळीबार)
विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar ) म्हणाले की, महाराष्ट्रातील (Maharashtra) चित्र बघता मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) आंदोलनाला पूर्वीसारखी धार दिसत नाही. वारंवार आंदोलन करून अर्धवट सोडणे यात समाजाचे नुकसान आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला सरकारने कशाप्रकारे घ्यायचे ते सरकार ठरवतील, असे वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान या वडेट्टीवारांच्या प्रतिक्रियेबद्दल जरांगे (Manoj Jarange) म्हणाले की, विजय वडेट्टीवारांनी आंदोलन करावे. त्यांनी जनतेच्या आक्रोशाबद्दल बोलायला हवे. पण त्यांना आमची लेकरे मोठी झालेली खपत नाही, अशी टीका जरांगेंनी केली. (Vijay Wadettiwar )
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community