Vijay Wadettiwar यांचा दिल्लीत कांगावा

168
Vijay Wadettiwar यांचा दिल्लीत कांगावा
  • प्रतिनिधी 

महारष्ट्रातचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना दिल्ली दौऱ्यावर असताना सरकारने प्रोटोकॉलनुसार गाडी दिली. तरीसुद्धा, वडेट्टीवार अपमान झाला असल्याचा अपप्रचार करीत आहेत. सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार एक दिवसाच्या दौऱ्यावर दिल्लीत आले होते. वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाच्या सोयी सुविधा सरकारकडून पुरविल्या जातात. मुख्यमंत्री यांच्यानंतरचे ते सर्वात मोठे घटनात्मक पद आहे. मात्र, शनिवारी दौऱ्यावर दिल्लीत आले असताना निवासी आयुक्तालायकडून उपेक्षा करण्यात आली असा त्यांचा आरोप आहे. विरोधी पक्ष नेत्यांना प्रोटोकॉलनुसार, निवासी आयुक्तालयाने त्यांना शासकीय गाडी पुरवयाला हवी होती. आयुक्तालयाने गाडी दिली. मात्र, प्रायव्हेट गाडी दिली गेली असे त्यांचे म्हणणे आहे.

(हेही वाचा – Kolkata Crime: कोलकाता रुग्णालयात आजारी मुलाच्या आईचा विनयभंग! वॉर्डबॉयला अटक)

निवासी आयुक्तालायच्या अधिकारी स्मिता शेलार यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, “सर्वोच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून १० न्यायाधीश दिल्लीत आले आहेत. ते सदनात थांबले आहेत आणि त्यांना शासकीय गाडी देण्यात आली होती. या गाडीचा नंबर सर्वोच्च न्यायालयात देण्यात आला होता. वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांचा कार्यक्रम रात्री ११ च्या सुमारास आला. यामुळे, ऐनवेळी आम्हाला काहीही करता आले नाही. या कारणामुळे त्यांना शासकीय गाडी पुरवू शकलो नाही. मात्र, दुसरी गाडी देण्यात आली.तसेच सर्व प्रोटोकोल देण्यात आला होता”, असे शेलार यांनी सांगितले.

(हेही वाचा – शरद पवारांमुळे महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर; भाजपाच्या Gopichand Padalkar यांचा पवारांना खोचक टोला)

वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिल्लीत त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेऊन राज्यातील राजकीय परिस्थिवर चर्चा केली. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि वडेट्टीवर यांच्यातील भांडणाचा मुद्दा काँग्रेस मुख्यालयात पोहचला आहे. मात्र या मुद्यावर काहीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.