सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना मनी लाँड्रिंगप्रकरणी राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे सीए महेश गुरव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. (Vijay Wadettiwar) यामुळे आता हसन मुश्रीफ विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ‘मुश्रीफांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.
(हेही वाचा – Asian Games 2023 : पदकांचं शतक गाठणाऱ्या भारतीय संघावर पंतप्रधान नरेंद्री मोदींकडून कौतुकाची थाप)
वडेट्टीवार म्हणाले, “हसन मुश्रीफ यांच्या ऑडिटरचा जामीन अर्ज नाकारताना त्यांच्यावर पीएमएलए कोर्टाने अत्यंत गंभीर स्वरूपाचे निरीक्षण नोंदवले आहे. खरंतर या साखर कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचं कोर्टाने निरीक्षण नोंदवलेले आहे. आता या मंत्रिमंडळात मुश्रीफांना एक मिनीटसुद्धा ठेवू नये. सरकारला शेतकऱ्यांची कणव असेल, तर मुश्रीफांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. सरकारमधील आणखी नऊ मंत्र्यांना काढावंच लागेल,” असे वडेट्टीवार म्हणाले. (Vijay Wadettiwar)
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना मनी लाँड्रिंगप्रकरणी हसन मुश्रीफ यांचे सीए महेश गुरव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. गुरव यांना हसन मुश्रीफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या गुन्हेगारी कारवायांतून मिळालेल्या पैशांची पूर्ण कल्पना होती.
हा पैसा शेल कंपन्यांमध्ये वळवण्यात आल्याचेही तपासात उघड झाले आहे. शेतकऱ्यांकडून गोळा करण्यात आलेल्या पैशांचीही सीए गुरव यांना कल्पना होती. मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी कट रचून शेतकऱ्यांकडून पैसे घेतले आणि त्यांची फसवणूक केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. (Vijay Wadettiwar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community