होय, २०१४ सालीच मला खरे स्वातंत्र्य मिळाले! विक्रम गोखले यांचा पुनरुच्चार 

स्वातंत्र्यावर कंगनाने केलेले भाष्य हे तिचे वैयक्तिक मत आहे. त्याला मी दुजोरा दिला. तिच्या मतासाठी कंगनाची जसे स्वतःची कारणे आहेत, तशी माझीही स्वातंत्र्यावर स्वतःच्या मतांवर कारणे आहेत. त्यावर लागलीच बोंबाबोंब सुरु झाली. मी राजकीय विश्लेषक नसलो तरी राजकीय अभ्यासक आहे. म्हणून मी आजही म्हणतो की, माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाला २०१४ साली खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले, असा पुनरुच्चार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केला.

अभिनेत्री कंगना राणावत हिने स्वातंत्र्यावर वक्तव्य केले. त्यावर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर विक्रम गोखले यांनी कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन केले. त्यामुळे गोखले यांच्यावर टीका होणे सुरु झाले. त्यावर गोखले यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या वक्तव्यामागील भूमिका स्पष्ट केली.

वक्तव्याचा विपर्यास केला!

आपण केलेली वक्तव्य जशीच्या तशी दाखवली नाहीत. त्याचा विपर्यास करून दाखवण्यात आली. त्यामुळे आज आपण जे बोलणार आहे, त्याचे माझ्यासाठीही रेकॉर्डिंग करत आहे, असेही गोखले म्हणाले. माझ्या ७६व्या वाढदिवशी माध्यमांनी आर्यन खान आणि शाहरुख खान यांच्या विषयावर माझा संबंध नसतानाही प्रश्न विचारून माध्यमांनी पहिला गुन्हा केला आहे. माझ्या स्वातंत्र्यावरील मतांमागील कारणे जाणून घ्यायची असतील, तर इंग्लंड येथून प्रसिद्ध होणाऱ्या गार्डियन दैनिकात १८ मे २०१४ रोजी प्रसिद्ध झालेल्या लेख वाचावा. कंगनाला मी प्रत्यक्ष ओळखत नाही, तिच्याबरोबर कामही केले नाही. पण म्हणून एखाद्याने मांडलेल्या विचारांवर मत मांडू नये, असा कायदा नाही, असेही गोखले म्हणाले.

(हेही वाचा पंतप्रधानांनी ७ वर्षांत पहिल्यांदा केली देशवासियांची ‘मन की बात’!)

धर्म संकल्पना घाणच! 

हा देश भगवा नाही, धर्मनिरपेक्ष आहे. यावर माझा विश्वास आहे. धर्म ही संकल्पना घाणच आहे. धर्म बाजूला ठेवून समाजात सुसंवाद राखावा. ही अपेक्षा असते. त्यावर माझा विश्वास आहे. पण तथाकथित निधर्मीयता किंवा सुडो सेक्युलॅरिझम याला माझा विरोध आहे. हेच सुडो सेक्युलॅरिझम मोठमोठे व्यक्ती आत्मसात करून वावरत असतात. हेच लोक त्यांचे विचार त्यांच्या बंगल्याच्या बाहेर ठेवतात, घरात मात्र धर्म धर्म करतात. असे अनेक जण मला माहित आहेत, जातपात आणि धर्म या अत्यंत नीच गोष्टींनी देश पोखरला आहे, असेही विक्रम गोखले म्हणाले.

बॉलिवूडचे कुणीही माझे वाकडे करू शकणार नाही! 

शाहरुख खान आणि आर्यन खान हा विषय माझ्यासाठी क्षुल्लक आहे. कुणीही माझे वाकडे करू शकत नाही. माझ्यासाठी शाहरुख हा आदर्श नाही. त्याऐवजी दोनच दिवसापूर्वी २१ वर्षांचा मुलगा सीमेवर आपल्या रक्षणासाठी छातीवर गोळ्या झेलल्या तो जवान माझ्यासाठी आदर्श आहे, असेच विक्रम गोखले म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here