स्वातंत्र्य भिकेत मिळालंय, कंगनाच्या ‘त्या’ वक्तव्याचं गोखलेंकडून समर्थन! म्हणाले…

125

कंगनाच्या या विधानाचं समर्थन केलं आहे. भीक मागून स्वातंत्र्य मिळालं असं कंगना म्हणालीय. तिच्या या म्हणण्याशी मी सहमत आहे. हे स्वातंत्र्य दिलेलं आहे बरं का, असं गोखले म्हणाले. तसेच ज्या योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या योद्ध्यांना फाशी जाताना त्यावेळचे मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांनी या योद्ध्यांना वाचवलं नाही. आपल्या देशातील हे लोक ब्रिटिशांविरोधात उभं राहत आहेत हे माहीत असूनही त्यांना वाचवलं नाही. असेही लोक त्याकाळी आपल्या राजकारणात होते. भरपूर वाचलं आहे मी, असंही त्यांनी सांगितलं.

असं म्हणाले विक्रम गोखले

कंगनाच्या या विधानाचं समर्थन करत विक्रम गोखले म्हणाले, भीक मागून स्वातंत्र्य मिळालं असं कंगना म्हणालीय. तिच्या या म्हणण्याशी मी सहमत आहे. हे स्वातंत्र्य दिलेलं आहे बरं का? तसेच ज्या योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या योद्ध्यांना फाशी जाताना त्यावेळचे मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांनी या योद्ध्यांना वाचवलं नाही. आपल्या देशातील हे लोक ब्रिटिशांविरोधात उभं राहत आहेत हे माहीत असूनही त्यांना वाचवलं नाही. असेही लोक त्याकाळी आपल्या राजकारणात होते. भरपूर वाचलं आहे मी, असंही त्यांनी सांगितलं.

(हेही वाचा – उधळलेली मुक्ताफळं कंगनाला पडली महागात, ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा संताप)

‘देश कधीही हिरवा होणार नाही’

दरम्यान, यासोबतच विक्रम गोखले यांनी आणखी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “हा देश कधही हिरवा होणार नाही, हा देश भगवा राहिला पाहिजे. ते पुढे म्हणाले, जे ७० वर्षांत झालं नाही ते मोदींनी केलं. पक्षाचं काम सर्वच करतात पण ते देशासाठी काम करतात.”लाल बहादूर शास्त्री सोडून आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना मी शंभराच्या खाली गुण देतो. पण त्यांची जयंती ही २ ऑक्टोबरला येते ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. किती वर्षे कारस्थान आहे? हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे, असंही विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.