अयोध्या येथील राम मंदिर सोहळ्याला काँग्रेस (Congress) नेते उपस्थित राहणार नसल्याचे पक्षाने स्पष्ट केल्यावर देखील काँग्रेसच्या नेत्याने अयोध्यामध्ये उपस्थिती दर्शविल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हिमाचल प्रदेश सरकारमध्ये मंत्री आणि काँग्रेस (Congress) नेते विक्रमादित्य सिंह (Vikramaditya Singh) सोमवारी (२२ जानेवारी) अयोध्येत उपस्थित होते. यामुळे विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. (Ayodhya Ram Mandir)
अयोध्येत सुमारे पाचशे वर्षांनंतर राम मंदिराची निर्मिती होत आहे. मंदिराचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून सोमवारी लोकार्पण सोहळा पार पडला. रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी राम मंदिर ट्रस्टच्या वतीने देशभरातील प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र हा भाजप (BJP), आरएसएसचा (RSS) कार्यक्रम असल्याची टीका करून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंसह (Mallikarjun Kharge) इतर विरोधक नेत्यांनी सोहळ्याला जाणे टाळले. पक्षाच्या हायकमांडने भूमिका घेतल्यानंतरही काँग्रेसच्या (Congress) एका मोठ्या नेत्याने थेट अयोध्या गाठली. त्यामुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या गेल्या आहेत. हिमाचल प्रदेश सरकारमध्ये मंत्री आणि काँग्रेस (Congress) नेते विक्रमादित्य सिंह (Vikramaditya Singh) सोमवारी अयोध्येत दाखल झाले. त्यांनी रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाला हजेरी लावली. काँग्रेस (Congress) हायकमांडने घेतलेल्या निर्णयाविरोधात विक्रमादित्य (Vikramaditya Singh) यांनी पाऊल उचलल्याने चर्चांना उधाण आले आहे. विक्रमादित्य (Vikramaditya Singh) हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांचे पुत्र असल्याने पक्षांतर्गत त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Ayodhya Ram Mandir)
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराला काय दिली भेट; काय आहे त्याचे महत्व)
सिंह यांच्या अयोध्या उपस्थितीमुळे काँग्रेसमध्ये चर्चांना उधाण
यापूर्वी हिमाचलमधील काँग्रेसचे (Congress) आमदार सुधीर शर्मा यांनी निमंत्रण स्वीकारून सोहळ्याला जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार शर्माही अयोध्येत पोहोचले होते. अयोध्येला जाण्यासाठी विक्रमादित्य सिंह (Vikramaditya Singh) रविवारी चंदीगडहून लखनौला पोहोचले होते. तेथे त्यांनी आपले राज्याचे समकक्ष जितिन प्रसाद यांचीही भेट घेतली. त्यानंतर सोमवारी झालेल्या राम मंदिर लोकार्पण आणि रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला हजेरी लावली. अयोध्येतील सोहळ्यात सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर सोनिया गांधींना (Sonia Gandhi) आपली भूमिका बदलावी लागली. अयोध्येत राम दर्शनासाठी शक्य होईल त्यावेळी जाणार आहे. मात्र २२ जानेवारीला होणाऱ्या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही, हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते. पक्षाच्या हायकमांडने घेतलेल्या भूमिकेला छेद देत सिंह अयोध्येतील कार्यक्रमास उपस्थित राहिल्याने काँग्रेसमध्ये (Congress) उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. (Ayodhya Ram Mandir)
दरम्यान, हिमाचलमध्ये २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सख्खूंनी राम मंदिराचा अभिषेक केला. तसेच सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात सार्वजनिक सुटी जाहीर केली. सख्खू यांनी रविवारी शिमल्याच्या राम मंदिरात जाऊन पूजा केली. ते म्हणाले, ‘भगवान राम हे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत. ते आदर्श आणि देशाची संस्कृती आहेत. मी माझ्या घरात दिवे लावणार आहे आणि इतरांनीही तसे करावे. लवकरच मी अयोध्येला भेट देईन,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (Ayodhya Ram Mandir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community