Vikroli Assembly Election 2024 : राऊत यांना रस्त्यावर फिरण्याची वेळ

587
Vikroli Assembly Election 2024 : राऊत यांना रस्त्यावर फिरण्याची वेळ
Vikroli Assembly Election 2024 : राऊत यांना रस्त्यावर फिरण्याची वेळ
विशेष प्रतिनिध मुंबई

विक्रोळी विधानसभा मतदार (Vikroli Assembly Election 2024) संघात तिसऱ्यांदा निवडून येत विजयाची हॅट्रीक मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांचे आता धाबेच दणाणले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि मनसेचे कडवे आव्हान विचारात घेता राऊतांनी आता विक्रोळीत रस्त्यावर फिरण्यास सुरुवात केल्याचे पहायला मिळत आहे. सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्याने शिवसेना पक्ष स्वबळावर लढला होता. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढवूनही आपण ५८ हजार मते घेतली होती, त्यामुळे भविष्यात माझ्यासमोर आव्हान नाही असे म्हणणाऱ्या राऊत यांना आता डोळ्यासमोर पराभव दिसून लागल्याने त्यांनी आतापासूनच चाळी, वस्ती आणि रस्तोरस्ती फिरत लोकांमध्ये मिसळण्यास सुरुवात केल्याने विक्रोळीकरांनाही आता आश्चर्य वाटू लागले आहे.

नुकत्याच झालेल्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून उबाठा शिवसेनेचे संजय दिना पाटील हे विजयी झाले असून या मतदार संघातील विक्रोळी विधानसभा मतदार (Vikroli Assembly Election 2024) संघातून पाटील यांना ६८, ६७३ एवढी मते मिळाली तर भाजपाचे मिहिर कोटेचा यांना ५२, ८०७ एवढी मते मिळाली. त्यामुळे १६ हजार मतांची आघाडी उबाठा शिवसेनेचे उमेदवार संजय पाटील यांना मिळाली आहे. या विक्रोळी विधानसभा मतदार संघात तब्बल १६ हजार मतांची आघाडी मिळाल्याने विद्यमान आमदार सुनील राऊत हे सेफ झोनमध्ये असल्याचे मानले जात असले तरी संजय पाटील यांची विक्रोळीत वैयक्तिक मते असल्याने त्यांचे मतदान वाढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात भाजपाचा उमेदवार यंदा निवडणूक रिंगणात उतरल्यास सुनील राऊत (Sunil Raut) यांच्यासाठी ही निवडणूक जड जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचा – IndusInd Bank Mutual Fund : इंडसइंड बँकेला म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी)

सन २०१४च्या निवडणुकीत सुनील राऊत यांच्या विरोधात मनसेचे मंगेश सांगळे आणि विद्यमान खासदार संजय दिना पाटील हे उमेदवार होते. तसेच काँग्रेसचे संदेश म्हात्रे हे उमेदवार होते. परंतु त्यावेळी भाजपाने उमेदवार दिला नसला तरी यावेळी भाजपाची पूर्ण तयारी असून जर भाजपाने या मतदार संघात आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्यास येथील निवडणूक अटीतटीची जाईल, असा अंदाज आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून माजी नगरसेवक मंगेश पवार हे इच्छुक होते, परंतु युती झाल्याने त्यांची निराशा झाली होती. परंतु यंदा भाजपाला हा मतदार संघ सुटला जाण्याची शक्यता असून तसे झाल्यास मंगेश पवार यांना उमेदवारी मिळाल्यास सुनील राऊत यांच्यासमोर कडवे आव्हान तयार होईल, याच भीतीने राऊत हे भाजपाने या मतदार संघात उमेदवार देवू नये आणि दिल्यास मंगेश पवार नसावे यासाठी ते देवाला साकडे घालताना दिसत आहेत, असे त्यांचे कार्यकर्ते खासगीत बोलत आहेत. (Vikroli Assembly Election 2024)

(हेही वाचा – Badlapur च्या शाळेत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, ४ दिवसांनंतर शाळेचा माफीनामा)

विशेष म्हणजे विद्यमान खासदार संजय पाटील यांचा डोळा आता भांडुप आणि विक्रोळी या दोन मतदार संघावर असून विक्रोळी ऐवजी भांडुपवर पाटील यांचा अधिक दावा असेल असे बोलले जात आहे. त्यामुळे विक्रोळी मतदार संघात राऊत यांना पुन्हा उमेदवार मिळेल आणि हा मतदार संघ शिवसेनेचा असला आणि त्यांच्या दावा असला तरी राऊत यांना शह देणारा उमेदवार नाही. त्यामुळे हा मतदार संघ भाजपाच्या वाट्याला येवू शकतो. पण मनसे स्वतंत्र की महायुतीत लढते याचा अंतिम निर्णय होणे बाकी आहे. महायुती सोबत आल्यास मनसेचा या मतदार संघावर दावा असेल. पण दोन विभानसभा निवडणुकीत मनसेला राऊत यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण करता आले नाही. उलट मनोज कोटक हे खासदार असताना त्यांनी विक्रोळी मतदार संघात भाजपाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत केली. त्यामुळे या मतदार संघात मनसे पेक्षा भाजपाची ताकद या मतदार संघात अधिक असून भाजपाने मजबूत उमेदवार दिल्यास राऊत यांना अधिक रस्त्यावर उतरून काम करावे लागेल आणि सकाळच्या ९ च्या बातम्या देणाऱ्या उबाठा शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनाही भावासाठी विक्रोळीत रस्त्यावर फिरण्याची वेळ येईल असे बोलले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.