बापरे! महापौर पदासाठी ‘या’ पक्षाने प्रत्येक नगरसेवकाला दिले होते ३५ लाख

94

कोल्हापूर महापालिकेत जनसुराज्य शक्ती पक्षाचा महापौर करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला ३५-३५ लाख रुपये दिले होते. ईर्षा आणि भावनेच्या राजकारणातून माझ्या हातून चूक घडली,’ अशी धक्कादायक कबुली जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा रविवारी झाली. या प्रसंगी कोरे यांनी ही कबुली दिली. विशेष म्हणजे, यावेळी व्यासपीठावर महादेवराव महाडिक उपस्थित  होते.

चूक केली मान्य 

पंधरा वर्षांपूर्वी आमदार कोरे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिकेतील माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले. नगरसेवकांना आपल्याकडे खेचून महाडिकांची महापालिकेतील सत्ता संपुष्टात आणली होती. या कालावधीतील चुकीच्या घडामोडीविषयी कोरे यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे चूक मान्य केली. कोल्हापूर महानगरपालिकेत जनुसराज्य पक्षाचा महापौर करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यावेळी पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक हे एकत्र होते. तर, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि मी स्वत: एकत्र होतो. महानगरपालिकेत नगरसेवकांना लाखो रुपये दिल्यामुळे सर्वसामान्य माणसांकडून आपला आदर कमी होणार आहे. असं आमदार कोरे म्हणाले.

 पावित्र्य जपले पाहिजे

लोकांकडून चांगला प्रतिनिधी निवडला पाहिजे. लोकांकडून आपल्याला आदर मिळणार नसेल तर चांगला समन्वय आणि चांगल्या विचाराने राजकारण करता येईल का? हा प्रामाणिक प्रयत्न केला आणि परमेश्‍वराच्या कृपेने विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध झाली. कोणत्याही निवडणूका लोकशाहीनेच झाल्या पाहिजेत. त्याचे पावित्र्य जपले पाहिजे. असेही कोरे यांनी सांगितले. यावेळी, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.