विनायक मेटे यांच्या पार्थिवावर बीडमध्ये सोमवारी अंत्यसंस्कार

88

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या पार्थिवावर सोमवारी (१५ ऑगस्ट) दुपारी १ वाजता बीडमधील कॅनॉल रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपामागील एका शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी सकाळी झालेल्या अपघातात मेटे यांचे दुर्दैवी निधन झाले.

(हेही वाचा – विनायक मेटेंचा ड्रायव्हर एकनाथ कदम पोलिसांच्या ताब्यात! होणार चौकशी)

मेटे यांचे पार्थिव मुंबईहून शिवसंग्राम भवनात रविवारी (१४ ऑगस्ट) रात्री ९ वाजता आणण्यात येईल. त्यानंतर बीडमध्ये शिवसंग्राम भवन येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली. दरम्यान शिवसंग्राम भवन येथे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी अंत्यविधी स्थळाची पाहणी केली असल्याचे सांगितले जात आहे.

मेटेंच्या निधनावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री भावूक

या घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रुग्णालयात दाखल झालेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विनायक मेटेंच्या निधनावर प्रतिक्रिया देताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, ही घटना दुर्दैवी आहे. माझा विश्वासच बसत नाही. त्यांच दुःखद निधन झालं आहे. त्यांनी मराठा समाजासाठी अनेक आंदोलनं केली आहे. शिवरायांच्या स्मारकाबद्दलचीही त्यांची तळमळ मला जाणवली. ही घटना महाराष्ट्रासाठी आणि आमच्यासाठी दुःखद आहे. मराठा समाजासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पाठपुरावा केलाय, असा नेता आपल्यात नाही. त्यांचं दुःखद निधन झालंय, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.