शिवसेनेतील अभूतपूर्व फुटीनंतर संघटना बांधणीवर भर दिलेल्या उद्धव ठाकरे यांनी रविवारी आपल्या गटाच्या कार्यकारिणीचा विस्तार केला. नव्या विस्तारात सचिव म्हणून कार्यरत असलेल्या खासदार विनायक राऊत, राज्यसभा सदस्य अनिल देसाई आणि माजी मंत्री अनिल परब यांच्यासह सहा जणांना नेतेपदी बढती देण्यात आली आहे. नेतेपदी वर्णी लागलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये ठाण्याचे खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र वायकर आणि ठाकरे गटाचे विधिमंडळातील प्रतोद सुनील प्रभू यांचा समावेश आहे. (UBT)
पुढील वर्षाच्या सुरुवातीला होऊ घातलेली लोकसभा आणि त्यानंतर होणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाची फेरचना केली आहे. या फेररचनेत कल्याणचे विजय उर्फ बंड्या साळवी, परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव, कोल्हापूरचे संजय पवार, मुंबईच्या माजी नगरसेविका राजुल पटेल, शीतल देवरुखकर, शरद कोळी, अस्मिता गायकवाड, नाशिकच्या शुभांगी पाटील, जान्हवी सावंत आणि छाया शिंदे यांच्यावर उपनेते पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. (UBT)
(हेही वाचा – Israel Palestine Conflict : उत्तर गाझामधून हजारोंचे स्थलांतर)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून पक्ष आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर ‘मातोश्री’शी एकनिष्ठ राहिलेल्या शिंदे गटाशी न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईत दोन हात करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नेतेपदी संधी देऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. याशिवाय खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याणमध्ये विजय साळवी यांना तर मराठवाड्यात संजय जाधव यांना संघटनेत स्थान देऊन त्यांना बळ दिले आहे. (UBT)
युवा शिवसेनेचे सचिव म्हणून काम करणाऱ्या वरुण सरदेसाई यांना मुख्य संघटनेत सचिव म्हणून स्थान देण्यात आले आहे. सरदेसाई हे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे मावसबंधू आहेत. समाज माध्यमात ठाकरे गटाची बाजू प्रभावीपणे मांडणारे मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य साईनाथ दुर्गे आणि चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांची कन्या सुप्रदा फातर्पेकर यांची सचिवपदी वर्णी लागली आहे. तर संघटक म्हणून मुंबईचे विलास व्हावळ, विलास रुपवते आणि छत्रपती संभाजीनगरचे चेतन कांबळे यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेना नेते : मनोहर जोशी, लीलाधर डाके, दिवाकर रावते, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनंत गीते, अरविंद सावंत, भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचारे रवींद्र वायकर आणि सुनील प्रभू. (UBT)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community