UBT ने मुंबईत उमेदवार बदलला; आता प्रशासकीय चूक नाही तर उमेदवाराच्या नावावरूनच पेचप्रसंग

90
UBT ने मुंबईत उमेदवार बदलला; आता प्रशासकीय चूक नाही तर उमेदवाराच्या नावावरूनच पेचप्रसंग
UBT ने मुंबईत उमेदवार बदलला; आता प्रशासकीय चूक नाही तर उमेदवाराच्या नावावरूनच पेचप्रसंग

विधानसभा निवडणुकीसाठी दि. २६ ऑक्टोबर रोजी उबाठा (UBT) गटाने चार जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये वर्सेावा, घाटकोपर पश्चिम, मलबार हिल आणि दहिसर विधानसभेचा समावेश होता. मात्र, दहिसरमध्ये घोसाळकर कुटुंबियांपैकी कुणाला उमेदवारी द्यायची असा पेचप्रसंग पक्षासमोर होता. कारण दहिसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर (Tejaswini Ghosalkar) आणि वडील विनोद घोसाळकर दोघेही दहिसर विधानसभेसाठी इच्छुक होते.

( हेही वाचा :  Virat Kohli : विराट कोहलीला एका कसोटीत दोनदा बाद करणारा मिचेल सँटनर

दरम्यान उबाठा (UBT) गटाने दि. २६ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या नावात सर्वप्रथम दहिसरमधून तेजस्विनी घोसाळकर (Tejaswini Ghosalkar) यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, तासाभरातच हे नाव बदलण्यात आलं आणि अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांचे वडील विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांचे नाव यादीत टाकत उमेदवारीची यादी एडिट करण्यात आली. त्यामुळे दहिसर विधानसभेतून विनोद घोसाळकर आता उबाठाचे अधिकृत उमेदवार आहेत. याआधी २००९ साली विनोद घोसाळकर यांच मतदारसंघातून आमदार होते. मात्र २०१४ पासून मनीषा चौधरी या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. (UBT)

तसेच याआधी उबाठा (UBT) गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यादीत बदल होतील असे सांगितले होते. त्याचबरोबर यादीत प्रशासकीय चुक असल्याचे स्पष्ट केले होते. मुळात त्या यादीत मित्रपक्षांच्या जागांवरही उबाठाने उमेदवार दिले होते. त्यामुळे मविआत वाद निर्माण होऊन उबाठाला यादी पुन्हा प्रसिद्ध करावी लागली होती. त्यात आता उमेदवारांच्या अदलाबदलीमुळे उबाठा गट पुन्हा चर्चेत आला आहे. या उमेदवारीबद्दल सामनामधून अधिकृत घोषणा ही करण्यात आली आहे. (UBT)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.