दहिसर विधानसभेत यंदा चौधरींच्या समोर Vinod Ghosalkar यांचे कडवे आव्हान

126
दहिसर विधानसभेत यंदा चौधरींच्या समोर Vinod Ghosalkar यांचे कडवे आव्हान
दहिसर विधानसभेत यंदा चौधरींच्या समोर Vinod Ghosalkar यांचे कडवे आव्हान
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

दहिसर विधानसभा मतदार संघातून तेजस्वी की विनोद घोसाळकर असा नावाचा घोळ असतानाच उबाठा शिवसेनेने विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला. मात्र, सन २०१४च्या निवडणुकीत विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांना पराभव पत्कारावा लागला, त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी घोसाळकर हे निवडणूक रिंगणात उतरले आहे. यंदा उबाठा शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ असून शिवाय दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्येमुळे जनतेची सहानुभूती आणि सासऱ्यांना निवडून आणण्यासाठी स्नुषा तेजस्वी घोसाळकर यांच्याकडून घेतली जाणारी मेहनत ही जमेची बाजू आहे. त्यामुळे मनसेला होणारे मतदान यावर घोसाळकर की मनिषा चौधरी (Manisha Chaudhary) यांच्या भवितव्याचा निर्णय अवलंबून आहे.

दहिसर विधानभा मतदार संघात सन २००९मध्ये शिवसेनेचे विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) हे तब्बल १६ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. त्यानंतर सन २०१४मध्ये विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांचा पराभव भाजपाच्या मनिषा चौधरी, (Manisha Chaudhary) काँग्रेसच्या शितल म्हात्रे आणि शिवसेनेतून मनसेत प्रवेश करत तिकीट मिळवलेल्या डॉ. शुभा राऊळ यांच्याकडून झाला. या निवडणुकीत घोसाळकर यांच्यावर झालेले आणि त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरून त्यांना आव्हान या महिलांनी त्यांचा पराभव केला होता. सन २०१४च्या निवडणुकीत सर्व पख स्वबळावर लढल्याने भाजपाच्या मनिषा चौधरी (Manisha Chaudhary) या तब्बल ३८ हजार ५८७ मतांनी विजयी झाल्या होत्या. तर काँग्रेसच्या शितल म्हात्रे यांना सुमारे २२ हजार आणि मनसेच्या शुभा राऊळ यांना १७ हजार मते मिळाली होती. त्यानंतर सन २०१९च्या निवडणुकीत पुन्हा शिवसेना भाजपाची युती झाल्याने मनिषा चौधरी या ६३ हजार ९१७ मताधिक्यांनी विजयी झाल्या आहेत.

(हेही वाचा – कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील Waqf Board चा ५३ ऐतिहासिक स्मारकांवर दावा)

मात्र, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्याने त्याच्या सहानुभूतीचा फायदा उठवण्यासाठी उबाठा शिवसेनेने घोसाळकर कुटुंबातील अभिषेक यांची पत्नी तेजस्वी यांना उमेदवारी देण्याचा न निर्धार पक्का केला होता, परंतु विनोद घोसाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपला अर्ज भरला. त्यामुळे मनिषा चौधरी (Manisha Chaudhary) यांच्या विरोधात विनोद घोसाळकर यांचे आव्हान असून मनसेच्यावतीने राजेंद्र येरुणकर हे निवडणूक रिंगणात उभे आहेत.

परंतु मागील लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदार संघातून तेजस्वी किंवा विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांना उमेदवारी देण्याचा निर्णय उबाठा पक्षाने घेतला होता. त्यानुसार तेजस्वी आणि विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांनी मतदार संघातून फिरण्यास सुरूवात केली होती, पण हा मतदार संघ् काँग्रेसला पक्षाला सोडल्याने शिवसेनेच्या वाट्याला हा मतदार संघ न आल्याने घोसाळकर यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत दहिसर मतदार संघातून विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी मतदार संघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दहिसर विधानसभेतून भाजपाला लोकसभेत मताधिक्य मिळाले असले तरी विधानसभेत चौधरी यांच्यासमोर घोसाळकर यांचे प्रमुख आव्हान असेल आणि मनसेला मिळणाऱ्या मतांवरच घोसाळकर आणि चौधरी यांच्यातील कोण बाजी मारणार हे ठरणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.