भारतीय जनता पक्षात दीर्घकाळापासून दुर्लक्षित राहिलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री विनोद तावडे यांच्याकडे पक्षाने पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. त्यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्यात आले आहे.
तावडे यांच्याशिवाय बिहारचे ऋतुराज सिन्हा यांची राष्ट्रीय मंत्री, झारखंडच्या आशा लाक्रा यांची राष्ट्रीय मंत्री, पश्चिम बंगालच्या भारती घोष आणि राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून शहजाद पूनावाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी २१ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या या नियुक्त्या तत्काळ लागू झाल्या आहेत.
कोण आहेत विनोद तावडे?
- तावडे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात.
- याआधी ते राष्ट्रीय सचिव म्हणून कार्यरत होते.
- त्यांना १६ ऑक्टोबर २०२१ रोजी हरियाणा महानगरपालिका निवडणुकीचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- यापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात ते महाराष्ट्राचे शिक्षण व सांस्कृतिक मंत्री होते.
- ते महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेही राहिले आहेत.
- तावडे महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस आणि मुंबईचे पक्षाध्यक्षही राहिले आहेत.
- 8 वर्षांपूर्वी तावडेंनी संजय दत्तला पुण्यातील येरवडा कारागृहात रम आणि बिअर दिल्याचा आरोप केला होता.
(हेही वाचा : शिवशाहिरांचे कलादालन उभारा! भाजपाची मागणी )
Join Our WhatsApp Community