नालासोपारा येथील एका हॉटेलमध्ये भाजपा नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांना पैसे वाटत असताना रंगेहाथ पकडल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते आणि नालासोपारा विधानसभेतील उमेदवार क्षितीज ठाकूर (Kshitij Thakur) यांनी केला आहे. तसेच यावेळी हॉटेलमध्ये भाजपाचे (BJP) उमेदवार राजन नाईक देखील उपस्थित होते. यावेळी बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना (Vinod Tawde) घेराव घातला. मात्र यासंपूर्ण प्रकरणाबद्दल वृत्तसंस्थांनी माहिती देताना भाजपा नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
( हेही वाचा : Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा किती पक्ष रिंगणात? )
भाजपा नेते विनोद तावडे (Vinod Tawde) म्हणाले की, या हॉटेलमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे आहेत. मी इथे यायच्या आधी मिटींग सुरु झाली होती. मी निवडणुकीच्या दिवशी मतदान कसे वाढवावे हे सांगण्यासाठी आलो होतो. यावेळी सर्व कार्यकर्त्यांना भेटून मी निघणार होतो. तेवढ्यात बविआचे (BVA) कार्यकर्ते आले आणि त्यांनी पैसे वाटप सुरु असल्याचे आरोप केले. माझी गाडी, माझी रुम तपासली. मात्र मी ४० वर्षांपासून राजकारणात आहे, मी कधीही निवडणुकीत पैसे वाटले नाहीत, असे ही तावडे (Vinod Tawde) म्हणाले. तसेच कोणीही आरोप केले तरी मला फरक पडत नाही, असेही तावडे यांनी सांगितले. (Vinod Tawde)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community