विरारच्या ‘त्या’ घटनेवर Vinod Tawde यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, भाजपा नेत्याने टीप दिल्याचा दावा खोटा 

77

मतदानाच्या एक दिवस आधी भाजपा सरचिटणीस विनोद तावडेंचा (Vinod Tawde) व्हीडिओ व्हायरल झाला असून, यामध्ये तावडे हे नालासोपारामधील एका हॉटेलमध्ये मतदारांना पैसे वाटत असल्याचे आरोप होत आहेत. या संबंधी विनोद तावडे म्हणाले की, माझी प्रतिमा मलिन व्हायचे कारण नाही, कारण पैशाचा विषय माझा नाही. पैशांसंदर्भातल्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. भाजपाच्या लोकांनी टीप दिली, हे (Hitendra Thakur) धादांत खोटे सांगत आहेत. टीप दिल्याचा दावा हा खोटा आहे, असे स्पष्टीकरण भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी दिले. (Vinod Tawde)

विनोद तावडे म्हणाले, वसई येथील घटनेसंदर्भात तीन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. मी आणि हितेंद्र ठाकुर (Hitendra Thakur) दोघांनी मिळून पत्रकार परिषद घेतल्यामुळे एक, माझा मतदारसंघ नसताना मी तिथे गेलो हा दुसरा आणि हितेंद्र ठाकुरही त्यांचा मतदारसंघ नसताना तिथे आले, याबाबत तिसरा एफआयआर नोंद झाला आहे. मात्र, पैशाचा एकही एफआयआर नोंदवण्यात आला नाही. पैशांसंदर्भातल्या सर्व बातम्या खोट्या आहेत. असे स्पष्टीकरण भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिले.  तसेच तुम्हाला शंका आली असेल, तर तुम्ही पैसे तपासा, हॉटेलमधील सीसीटीव्ही तपासा. जे मिळेल ते करा, माझे काही म्हणणे नाही, असे तावडे म्हणाले.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : आचारसंहिता कालावधीत ५३२ एफआयआर; सिंधुदुर्गात मात्र एकही गुन्हा नाही)

टीका करणाऱ्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी

येत्या २० नोव्हेंबर रोजी २८८ मतदार संघासाठी राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत. दरम्यान बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aaghadi) उमेदवार हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितीज ठाकूर (Kshitiz Thakur) घटनास्थळी दाखल झाले होते. त्या दोघांशी बोलणे झाल्यावर त्यांच्यासोबत मी एकाच गाडीतून बाहेर पडलो. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये टिपला गेला आहे. मी केवळ भाजपा कार्यकर्त्यांसोबत चहापानासाठी गेलो होतो व चर्चा करत होतो. त्यावेळी माझ्याकडून पैसे वाटप होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या संदर्भातील सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे दूध का दूध, पानी का पानी, स्पष्ट होईल. राहुल गांधी (Rahul Gandhi) व सुप्रिया सुळे (Supriya Sule) अशा यासंदर्भात टीका करणाऱ्या नेत्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. तसेच याबाबतीत निवडणूक आयोगाकडून निःपक्ष चौकशी व्हावी, असे विनोद तावडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.