राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ‘माझे कुटुंब, माझे जबाबदारी’ ही मोहीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राबवली. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर त्यांनी ‘होय, मीच जबाबदार’ ही मोहीम राबवली. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मी जबाबदार ही मोहीम राबवत असताना त्यांच्या युवा सेनेचे नेते मात्र बेजबाबदारपणे वागत असल्याचे
पहायला मिळत आहे. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला नियम पाळायला सांगत असतानाच, आता युवा सेनेचे सरचिटणीस आणि अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले वरुण सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनालाच केराची टोपली दाखवली आहे.
युवा सेनेच्या कार्यक्रमाला गर्दी
युवा सेनेच्या पदाधिकारी दौऱ्याला युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी सुरुवात केली आहे. युवा सेना वाढीच्या दृष्टीने त्यांचा हा दौरा मानला जात आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे नाशिक आणि बीड येथे झालेल्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने सर्वसामान्यांना एक न्याय आणि नेत्यांना दुसरा न्याय आहे का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. सध्या सरदेसाई हे मराठावाड्याच्या संवाद दौर्यावर आहेत. त्यांचा नुकताच बीडमध्ये दौरा होता, यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घालून दिलेल्या नियमांना जणू काही या मेळाव्यात हरताळ फासण्यात आला.
(हेही वाचाः महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती आहेत शिक्षणसम्राट मंत्री? भातखळकरांनी जारी केली यादी…वाचा…)
बीडमध्ये कोरोना वाढत असतानाही गर्दी
बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बधितांची संख्या वाढत चालली आहे. अशातच अशा मेळाव्याचे आयोजन होत असल्याने, गर्दी करुन कोरोनास निमंत्रण दिले जात आहे का?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या मेळाव्यास संपूर्ण जिल्ह्यातून सेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच याठिकाणी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचा कार्यकर्त्यांनी पुरता फज्जा उडवला होता. अनेकांनी आपल्या तोंडाला मास्क देखील लावले नव्हते. स्टेजवर देखील अनेकांनी गर्दी केल्याने कोरोना नियमांची मोठ्या प्रमाणात पायमल्ली झाल्याचे चित्र होते.
मनसेची टीका
युवा सेनेच्या कार्यक्रमाला होणाऱ्या गर्दीवरुन मनसेने टीका केली आहे. मनसेच्या अखिल चित्रे यांनी नाटक प्रयोगांसाठी नाट्यगृह बंद, राजकीय नौटंकीसाठी मात्र सुरू. राजकीय कार्यक्रमांवर बंदी, युवा सेना संवाद मात्र खुल्या मैदानात. सामन्यांनी मास्क नाही लावला तर दंड, पण यांना सर्व काही माफ. कायद्याचे डोस फक्त इतरांनाच का? युवा नातेवाईकांना सबकुछ माफ का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
(हेही वाचाः महापालिका अभियंत्यांच्या पदोन्नतीआड उभी ठाकली शिवसेना!)
Join Our WhatsApp Communityनाटक प्रयोगांसाठी नाट्यगृह बंद; राजकीय नौटंकीसाठी सुरू.
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) August 13, 2021
राजकीय कार्यक्रमांवर बंदी; युवा सेना संवाद मात्र खुल्या मैदानात.सामन्यांनी मास्क नाही घातला तर दंड यांना सर्व काही माफ.@CMOMaharashtra कायदेचे डोस फक्त इतरांनाच का ? युवा नातेवाईकांना सबकुच्छ माफ…? pic.twitter.com/XvnjpkYdrz