मणिपूरमध्ये (Manipur Violence) १५ नोव्हेंबर रोजी एक महिला आणि दोन मुलांचे मृतदेह सापडल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर मणिपूरमध्ये पुन्हा एकदा जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. एवढंच नाही तर १६ नोव्हेंबर रोजी संतप्त जमावाने काही आमदार आणि मंत्र्यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत गाड्याची तोडफोड केली. त्यामुळे पुन्हा मणिपूरमध्ये तणाव (Manipur Violence) निर्माण झाला आहे. या सर्व घटनांची केंद्र सरकारकडून (Central government) दखल घेण्यात आली आहे.
मणिपूरमधील हिंसाचाराच्या (Manipur Violence) घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी तातडीने बैठक घेतली. या बैठकीत सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा करत केंद्राने राज्यातील सुरक्षेची परिस्थिती लक्षात घेता केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) ५,००० पेक्षा जास्त जवांनाचा समावेश असलेल्या अतिरिक्त ५० तुकड्या मणिपूरला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा-माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांच्या गाडीवर दगडफेक)
सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गृहमंत्री अमित शाह यांनी निमलष्करी दलांना मणिपूरमधील शांतता आणि सुव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देशही दिले असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. मणिपूरमध्ये (Manipur Violence) लवकरात लवकर शांतता प्रस्थापित आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणखी सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गरज भासल्यास आणि सुरक्षा रक्षक जवानांची गरज भासल्यास संख्या वाढवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community