बांगलादेशात हिंसाचार; Mamata Banerjee यांनी बांगलादेशी नागरिकांना पश्चिम बंगालमध्ये येऊन राहण्याचे दिले आवताण

270

सध्या बांगलादेशात सर्वत्र हिंसाचार सुरु आहे. त्यामुळे या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या हिंसाचारात १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशातील नागरिकांना पश्चिम बंगालमध्ये येऊन रहा, असे आवताण दिले.

बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. कोलकाता येथे शहीद दिनाच्या रॅलीनिमित्त व्हिक्टोरिया हाऊससमोर आयोजित सभेला संबोधित करताना ममता यांनी बांगलादेशातील जनतेला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, पश्चिम बंगालचे दरवाजे बांग्लादेशी आश्रितांसाठी नेहमी खुले असतील, असेही त्या म्हणाल्या.

(हेही वाचा Dr. Neelam Gorhe : गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात वीर सावरकरांच्या प्रतिमेचे घेतले दर्शन)

निर्वासितांबाबतच्या संयुक्त राष्ट्राच्या ठरावाचा संदर्भ देत ममता बॅनर्जी  (Mamata Banerjee) म्हणाल्या की, मी बांगलादेशबद्दल फार बोलू शकत नाही, कारण तो वेगळा देश आहे. यावर बोलण्याचा केंद्र सरकारला अधिकार आहे. पण मी एवढे सांगू शकते की, बांग्लादेशमधील पीडितांनी पश्चिम बंगालचा दरवाजा ठोठावला, तर मी नक्की मदत करेन आणि त्यांना आमच्या राज्यात आश्रय देईन. ज्यांचे नातेवाईक हिंसाचारग्रस्त बांगलादेशात अडकले आहेत, अशा सर्व बंगालमधील रहिवाशांसाठी आम्ही मदत करू. मी सर्वांना आवाहन करते की, बांगलादेशाबाबत कुठल्याही अफवांना बळी पडू नये. फक्त बंगालच भारताचे अस्तित्व सुरक्षित करू शकतो, बंगालशिवाय भारत नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.