नेताजींच्या जयंतीला बंगालमध्ये हिंसाचार, हवेत गोळीबार

पश्चिम बंगालच्या भाटपाडा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीला गालबोट लावणारी घटना घडली. याठिकाणी नेताजींच्या श्रद्धांजली कार्यक्रमात तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भाजपचे कार्यकर्ते आपसात भिडले. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या अंगरक्षकांना हवेत गोळीबार करावा लागला.

भाजप खासदार अर्जुन सिंह टार्गेट

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती निमित्ताने वंदन करण्यासाठी टीएमसी आणि भाजप कार्यकर्ते बैरकपूर येथे एकत्र जमले होते. यावेळी नेताजी यांच्या पुतळ्यावर पुष्पहार अर्पण करण्यावरुन दोन्ही गटामध्ये वाद झाला. हा वाद इतका उफाळला की परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्या सुरक्षा रक्षकांना हवेत गोळीबार करावा लागला. या घटनेचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. भाजप खासदार अर्जुन सिंह घटनास्थळी दाखल होताच त्यांना टार्गेट करण्यासाठी टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक सुरु केली, असा आरोप भाजपकडून करण्याच आला आहे. या दरम्यान अर्जुन सिंह यांच्या सुरक्षा रक्षकांनी हवेत गोळीबार सुरु करुन त्यांना सुरक्षितस्थळी घेऊन गेले. विशेष म्हणजे हा गदारोळ जेव्हा झाला तेव्हा पोलीसही तिथेच होते. घटनास्थळी तणाव निर्माण झाल्याचं लक्षात आल्यानंतर पोलीस पुढे आले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी थेट लाठीचार्ज सुरु केला. तणावाच्या पार्श्वभूमीवर परिसरात तातडीने मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. या घटनेदरम्यान अर्जुन सिंह यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली.

(हेही वाचा गोव्यातही प्रशांत किशोरच! टीएमसीमुळे काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात! काय आहे गोव्याचे भविष्य?)

टीएमसीच्या गुंडांनी हल्ला चढवला- खासदार सिंह

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना भाजप खा. अर्जुन सिंह म्हणाले की, आज, रविवावारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आमचे आमदार पवन सिंह नेताजींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गेले होते. तेव्हा टीएमसीच्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या दिशेला गोळ्या झाडण्यात आल्या. तसेच विटा फेकण्यात आल्या. त्यानंतर मी तिथे पोहोचलो तेव्हा माझ्यावरही हल्ला केला. पोलिसांच्या समोर सगळे घडले. माझी गाडी फोडण्यात आली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात आल्याचे अर्जुन सिंह यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here