देशात लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. मात्र मतदानाला सुरुवात होताच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराची (west Bengal violence) घटना घडली आहे. राज्यातील कूचबिहार लोकसभा (CoochBihar Lok Sabha 2024) मतदारसंघात चंदामारी येथे मतदान केंद्रासमोर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. (West Bengal)
(हेही वाचा – Virat Kohli Wax Statue : जयपूरच्या संग्रहालयात विराट कोहलीचा मेणाचा पुतळा)
या मंत्र्यांच्या घराशेजारी सापडला बॉम्ब
यासंदर्भातील माहितीनुसार, चंदामारी (Chandmari) येथे मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) कार्यकर्त्यांकडून ही दगडफेक केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. या दगडफेकीमध्ये भाजपाचा एक पोलिंग एजंट (Trinamool Congress) हा जखमी झाला आहे. तसेच केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते निशित प्रामाणिक यांच्या घराजवळ बॉम्ब सापडला. हा बॉम्ब पोलिसांनी हटवला आहे. (West Bengal)
(हेही वाचा – Navneet Rana: “सीतेला पण भोग चुकले नाही, आपण तर..” राऊतांच्या टीकेवर नवनीत राणांचा घणाघात)
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा असून, येथे ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष आणि भाजपा यांच्यात मुख्य लढत होणार आहे. तर काँग्रेस आणि डावे पक्ष हे या दोघांनाही आव्हान देतील. राज्यात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने २३, भाजपाने १८ तर काँग्रेसने ०१ जागा जिंकली होती. यावेळी राज्यातील मतदारांचा कौल कुणाकडे असेल हे आगामी ०४ जून रोजी स्पष्ट होणार आहे. (West Bengal)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community