रविकांत तुपकर यांचं ‘अन्नत्याग आंदोलन’ तूर्त स्थगित

65

सोयाबीन आणि कापसाला भाव मिळावा यासाठी रविकांत तुपकर यांचं गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरु होतं. पंरतु या अन्नत्याग आंदोलनादरम्यान, तुपकरांची तब्येत ढासळत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. परंतु, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. राज्य सरकारकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तर केंद्र सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर रविकांत तुपकर यांनी स्वतः आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे.

(हेही वाचा – कारवाईचा बडगा! २३८ रोजंदारी एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचा निर्णय)

अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण

दरम्यान, रविकांत तुपकर यांनी केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे समोर आले आहे. या अन्नत्याग आंदोलनामुळे तुपकरांची प्रकृती खालावली आहे. यामुळेच आक्रमक झालेल्या झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रतिसाद न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी एका संतप्त कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता आणि हे सुरू असलेले आंदोलन चिघळत चालले आहे. तर मलकापूर-औरंगाबाद राज्य महामार्गावर रास्ता रोको करत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली.

प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद नाही

अन्नत्याग आंदोलनाला शुक्रवारी संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला असून १७ नोव्हेंबर पासून हे आंदोलन सुरु आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरु केलेल्या अन्नत्यागाचा आजचा चौथा दिवस असून ठिकठिकाणी रास्तारोको करण्यात आला आहे. दरम्यान प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद नसल्याने कार्यकर्ते आणि शेतकरी आक्रमक झाले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.