घाटकोपर पश्चिम परिसरातील एका खासगी सोसायटीच्या परिसरात उभी असलेली एक कार पाण्यात बुडत असल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. या अनुषंगाने मुंबई महापालिकेने या घटनेशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
काय आहे घटना?
घाटकोपर पश्चिम कामा लेन येथील रामनिवास या जुन्या सोसायटीतील विहिरीवर कित्येक वर्षांपूर्वी सोसायटीने अर्ध्या भागात आरसीसी करुन, अर्धी विहीर झाकली होती व त्यावर सोसायटीतील रहिवाशी वाहने पार्क करत असत. या विहिरीवरील आरसीसी 13 जून रोजी खचून, त्यावर पंकज मेहता यांनी पार्क केलेली मोटार कार विहिरीत बुडली आहे. या कारमध्ये कोणीही नसल्याने घटनेत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही, तसेच कोणीही जखमी झालेले नाही. असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
आई शप्पथ! विहिरीत बुडाली ‘गाडी’
घाटकोपर पश्चिम कामा लेन येथील रामनिवास या सोसायटीत अर्ध्या भागात आर सी सी करुन अर्धी विहीर झाकली होती. त्या विहिरीवरील आरसीसी खचून त्यावर पंकज मेहता यांनी पार्क केलेली मोटार कार विहिरीत बुडाली.#Ghatkopar #Car #ViralVideo #Mumbai pic.twitter.com/zz5dpMyocC— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) June 13, 2021
सुरक्षेच्या उपाययोजना सुरू
या अनुषंगाने महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाद्वारे पाणी उपसण्याच्या कामाचे समन्वयन करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना तातडीने करण्यास संबंधित सोसायटीला सूचित करण्यात आले आहे. या घटनेत मनुष्यहानी किंवा कोणी जखमी नाही. वाहतूक नियंत्रण कक्षास माहिती दिली. स्थानिक घाटकोपर पोलिस ठाण्याचे अधिकारी/ कर्मचारी घटनास्थळी हजर आहेत.
Join Our WhatsApp Community