भारताच्या ‘रूपे’ ने उडवली ‘व्हिसा’, ‘मास्टर कार्ड’ ची झोप!

194

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या प्रत्येक बाबतीत स्वदेशीचा नारा देत आहेत. त्याअनुषंगाने पंतप्रधानांनी डिजिटल व्यवहारासाठी भारतीय ‘रूपे’ चा प्रसार-प्रचार करताच अमेरिकेची झोप उडाली आहे. भारताने ‘रूपे’चा प्रसार सुरू केल्यामुळे अमेरिकी व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे, अशी भीती व्यक्त केली आहे.

काय म्हणाले होते पंतप्रधान?

‘रॉयटर्स’ने दिलेल्या माहितीनुसार ‘व्हिसा’च्या अधिकाऱ्यांनी अमेरिकेतील व्यापारी प्रतिनिधींशी एक बैठक घेतली, त्यामध्ये याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. २०१८ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या वेळी ‘रूपे’ कार्डाचा वापर करणे ही राष्ट्र सेवा आहे, असे म्हटले होते. ‘सगळे नागरिक सीमेवर जाऊन देशाची सेवा करू शकत नाही, तर मग तुम्ही ‘रूपे’ कार्डाचा वापर करून देशाची सेवा करावी’, असे आवाहन केले होते. त्यानंतर हा विचार सोशल मीडियातून उचलून धरण्यात आला. मोदी यांनी स्वतः ते ‘रूपे’ कार्ड वापरत असल्याचे जाहीर केले होते.

(हेही वाचा धक्कादायक! मुंबईत ९४ हजार फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण बाकी)

‘व्हिसा’, ‘मास्टर कार्ड’ का वाटते भीती?

  • ‘व्हिसा’चे सीईओ अल्फ्रेड कैली यांच्यासह एकही अधिकाऱ्यांची बैठक पार पडली, त्यामध्ये याविषयावर चिंता व्यक्त करण्यात आली.
  • ‘मास्टर कार्ड’ नेही याप्रकरणी तक्रार केली की, पंतप्रधान मोदी हे स्थानिक नेटवर्क प्रमोट करत आहेत. यामुळे जगभरात प्रसारित होत असलेल्या ‘व्हिसा’ आणि ‘मास्टर कार्ड’ ला भारतात आव्हान बनले आहे.
  • नोव्हेंबर २०२० पर्यंत भारतातील ९५२ दशलक्ष डेबिट आणि क्रेडिटद्वारा झालेल्या व्यवहारापैकी ६३ टक्के व्यवहार ‘रूपे’ कार्डाशी संबंधित होते. २०१७ साली हा आकडा १५ टक्के होता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.