सांगली (sangli) लोकसभा मतदारसंघ (Lok Sabha constituency) जागावाटपात ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्याने विशाल पाटील (Vishal Patil) हे नाराज आहेत. त्यांचं नाराज होणं स्वाभाविक आहे. परंतु त्यांची नाराजगी दूर करण्या साठी बरेच प्रयत्न झाल्यानंतर देखील आता ते आज अपक्ष उमेदवारी भरणार आहेत. (Vishal Patil)
यामुळे काँग्रेसमध्ये (Congress) बंडखोरी होऊन महाविकास आघाडीला पहिला झटका लागला आहे.
शिवसेना उबाठा (Shivsena UBT) गटाकडून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी घोषित झाल्यापासून सांगली काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य सुरू होते. सांगली काँग्रेसचे (Congress) बडे नेते विश्वजीत पाटील (Vishwajit Patil) हे राज्य काँग्रेस तसेच दिल्ली काँग्रेस पर्यंत आपली नाराजी स्पष्टपणे सांगून आले होते. असे असताना देखील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती महाविकास आघाडी द्वारा झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही जागा शिवसेना उबाठा गटाला गेल्यापासून स्थानिक काँग्रेस (Congress) कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यातच आज विशाल पाटील (Vishal Patil) यांनी सांगली लोकसभे मधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे घोषित केले आहे. (Vishal Patil)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community