शिक्षकी पेशातील विश्वनाथ महाडेश्वर यांची घसरली जीभ, नवनीत राणांना म्हणाले…!

131

शिक्षकी पेशातील मुंबईचे माजी महापौर प्रा. विश्वनाथ महाडेश्वर यांचा तापट स्वभाव सर्वांनाच माहीत आहे. संतापाच्या भरात त्यांचे जीभेवर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे प्रा. महाडेश्वर यांनी थेट खासदार नवनीत राणा यांच्या विषयी अपशबद्ध वापरले. नवनीत राणा या अभिनेत्री आहेत, त्यांनी भाजपासाठी डान्स करावा, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे महाडेश्वर यांची जोगेश्वरीत शाळा आहे.

अमरावतीचे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी परवानगी मागितली. हनुमान चालीसा लावण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी विनंती करणार आहे, असे ते म्हणाले. त्यावर शिवसैनिकांनी मातोश्री बाहेर मोठी गर्दी केली होती.

(हेही वाचा ‘पुरंदरे’ माहितीचा स्त्रोत नव्हते; जेम्स लेन यांचा खुलासा!)

तर रवी राणा नवनीत राणांना सोडणार नाही  

त्यावेळी माध्यमांशी बोलताना माजी महापौर महाडेश्वर म्हणाले की, मातोश्रीला आदेश देण्याचा रवी राणा, नवनीत राणा यांना संविधानाने हक्क दिला नाही, त्यांनी कायद्याने वागावे. रवी राणा यांनी आत्मपरीक्षण करावे, नवनीत राणा या अभिनेत्री आहेत, त्यांनी भाजपासाठी डान्स करावा, त्यांनी मातोश्रीला आदेश देण्याच्या फंद्यात पडू नये. जर त्या इथे आल्या, तर आम्ही त्यांना सोडणार नाही. शिवसेनेचे हिंदुत्व खरे हिंदुत्व आहे आणि भाजपचे हिंदुत्व बेगडी आहे, आज देशामध्ये प्रचंड महागाई, विषमता, इंधन दरवाढ आहे. दारिद्र्यरेषेखालील संख्या वाढते आहे ,असे असताना धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचे काम मोदी सरकार करत आहेत. मातोश्री आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे. रवी राणा, नवनीत राणा यांनी इथे येऊन दाखवावे, असे आव्हान दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.