“राज ठाकरे चुहा है!”, भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान; माफी नाही तर अयोध्येत एन्ट्री नाही

मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. राज ठाकरेंच्या या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. इतकेच नाही तर राज ठाकरेंवर जोरदार टीका देखील केली आहे. बृजभूषण सिंह आक्रमक झाले असून राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली होती आणि यावर ते ठाम आहेत. दरम्यान, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध दर्शवत उत्तर भारतीयांनी राज ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज ठाकरे माफी मांगो, राज ठाकरे चूहा है अशा घोषणा यावेळी देण्यात आल्यात.

राज ठाकरेंनी माफी मागावी अन्यथा…

मंगळवारी राज ठाकरेंवर टीका करताना बृजभूषण सिंह म्हणाले, राज ठाकरे दंबग नाही तर उंदीर आहेत. पहिल्यांदा बाहेर पडत आहेत. तसेच राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांवर केलेल्या अत्याचारांबाबत माफी मागावी. त्यांनी माफी मागितली नाहीतर आम्ही त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही. उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगढचे नागरिक त्यांना विरोध करण्यासाठी सक्षम आहेत. इतका विरोध करू की ते आयुष्यात कधीही अयोध्येत पाय ठेवू शकणार नाही, असा इशारा बृजभूषण यांनी दिला आहे. आम्हाला मराठ्यांचा विरोध नाही. मराठे अयोध्येत आले तर आम्ही त्यांचं जंगी स्वागत करू. आम्हाला फक्त राज ठाकरेंचा विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ‘मविआ’ एकत्र लढणार! काय म्हणाले पवार?)

पुढे बृजभूषण असेही म्हणाले, राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांना विरोध केला. त्यांना मारहाण केली. पण, आता मारहाण झाली तर आम्ही शांत बसणार नाही. आम्ही महाराष्ट्रात पोहोचून त्यांना उत्तर देऊ. ते उत्तर भारतीयांना मारत होते तेव्हा काँग्रेस त्यांना सुरक्षा द्यायची. पण, आता सरकार बदललं आहे. त्यांना आता सुरक्षा मिळणार नाही. कोणीही देश तोडण्याची भाषा करत असेल तर सरकारने त्यांची सुरक्षा हटवली पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केलं.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here