काश्मीरच्या विषयावर आयोजित चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी ऑक्सफर्ड युनियनने ‘द काश्मीर फाईल’ या वास्तववादी चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांना निमंत्रण दिले होते, मात्र त्यांनी हे निमंत्रण नाकारले. आपण हे निमंत्रण का नाकारले, याचा खुलासा त्यांनी X वरील पोस्टद्वारे केला आहे.
IMPORTANT:
I was invited by the prestigious Oxford Union to debate on Kashmir. I found the theme offensive, anti-India, and anti-Kashmir. On principle, I have declined the offer. PFA my decline letter.@OxfordUnion pic.twitter.com/sXSO7UGUlx
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) September 5, 2024
काय म्हणाले अग्निहोत्री?
त्यांच्या पोस्टमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी (Vivek Agnihotri) लिहिले की, मला प्रतिष्ठित ऑक्सफर्ड युनियनने काश्मीरवर चर्चेसाठी आमंत्रित केले होते. परंतु मला त्यांची थीम आक्षेपार्ह, भारतविरोधी आणि काश्मीरविरोधी वाटली. तत्वतः मी हे निमंत्रण नाकारले आहे. ऑक्सफर्ड युनियनने मला आमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या व्यासपीठावर बोलणे हे सर्वांचे स्वप्न असते, पण मला तुम्ही ठरवलेल्या विषयामध्ये नकारात्मक जाणवली. त्यामुळे पूर्ण विचारांती मी आपले निमंत्रण आदरपूर्वक नाकारत आहे. हे व्यासपीठ स्वतंत्र काश्मीर राज्यावर विश्वास ठेवते आणि या विषयावरील चर्चेसाठी तुमचे निमंत्रण हे भारताच्या सार्वभौमत्वाला थेट आव्हान देणारे आहे, जे मला मला मान्य नाही. मला हे केवळ तिरस्करणीयच नाही तर आक्षेपार्ह वाटते. फक्त १.४ अब्ज भारतीयांसाठीच नाही, तर १९९० च्या काश्मीर नरसंहारात बळी पडलेल्या लाखो विस्थापित हिंदूंचा हा अपमान होईल. “काश्मीरचा विषय हा काही चर्चेचा विषय नाही. हा विषय दुःख, वेदना आणि शांतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. तिथे झालेला हिंदू नरसंहार हा हिंदूंच्या रक्ताने माखलेला आहे, तो प्रेक्षकांकडून टाळ्या मिळवण्याचा विषय नाही, असेही अग्निहोत्री म्हणाले. विवेक अग्निहोत्री यांनी 2 सप्टेंबर रोजी ऑक्सफर्ड युनियनला हे पत्र लिहिले, जे त्यांनी गुरुवारी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले.
2022 मध्ये, विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट खूप चर्चेत आला होता. अनेकांनी या चित्रपटाचे कौतुक केले, तसेच अनेकांच्या टीकेलाही त्यांना सामोरे जावे लागले. 1990च्या दशकात अल्पसंख्याक समुदायांना, विशेषत: काश्मीर पंडितांना ज्या हिंसाचाराचा सामना करावा लागला ज्यामुळे त्यांना घरे सोडून पळून जावे लागले, याचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community